IPL 2026 : आयपीएल 2026 स्पर्धेला (IPL 2026) पूर्ण रंग चढला असताना सनराइजर्स हैदराबाद संघाला मोठा झटका बसला आहे. संघाचा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्स दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. यंदाच्या हंगामात त्याने अद्याप एकही सामना खेळलेला नव्हता. हैदराबादने ब्रायडन कार्सच्या जागी श्रीलंकेच्या युवा वेगवान गोलंदाज दिलशान मधुशंका यांची बदली खेळाडू (IPL 2026) म्हणून घोषणा केली आहे. २५ वर्षीय मधुशंका लवकरच ऑरेंज आर्मीमध्ये सामील होणार असून, तो हैदराबादच्या गोलंदाजी आक्रमणाला बळकटी देण्याचा प्रयत्न करेल. ब्रायडन कार्सची दुखापत आणि माघार ब्रायडन कार्सला सनराइजर्स हैदराबादने रिटेन केले होते. मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी सरावादरम्यान त्याच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला स्पर्धेतून पूर्णपणे माघार घ्यावी लागली. कार्सची अनुपस्थिती हैदराबादसाठी मोठा धक्का ठरली आहे, कारण संघाची वेगवान गोलंदाजी आधीच कमकुवत दिसत आहे. पॅट कमिंन्सची कमतरता सनराइजर्स हैदराबादची गोलंदाजी यंदा मोठ्या अडचणीत आहे. कर्णधार पॅट कमिंन्स अद्याप दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही आणि संघासोबत जोडलेला नाही. त्याच्या अनुपस्थितीत (IPL 2026) इशान किशन संघाचे नेतृत्व करत आहे. IPL 2026 नुकत्याच राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात युवा गोलंदाज प्रफुल्ल हिंगे आणि साकिब हुसेन यांनी मिळून ८ विकेट्स घेत शानदार कामगिरी केली होती. तरीही संघाला अनुभवी गोलंदाजांची कमतरता जाणवत आहे. जयदेव उनाडकत आणि हर्शल पटेल अपेक्षेप्रमाणे प्रभावी ठरलेले नाहीत. तसेच अनुभवी फिरकी गोलंदाजाचीही हैदराबादच्या संघात कमतरता आहे. दिलशान मधुशंका बदली खेळाडू ब्रायडन कार्सच्या जागी हैदराबादने दिलशान मधुशंकाला ७५ लाख रुपये मध्ये करारबद्ध केले आहे. श्रीलंकेचा हा डावखुरा वेगवान गोलंदाज तिन्ही फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे. त्याने आतापर्यंत १ टेस्ट, २८ वनडे आणि १९ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. मधुशंका यंदाच्या आयपीएल हंगामात लवकरच हैदराबादकडून पदार्पण करेल अशी अपेक्षा आहे. सध्याच्या परिस्थितीत (IPL 2026) सनराइजर्स हैदराबादला गोलंदाजी विभागात मोठी आव्हाने आहेत. पॅट कमिंन्स परत येईपर्यंत युवा गोलंदाज प्रफुल्ल हिंगे आणि साकिब हुसेन यांच्यावरच मुख्य जबाबदारी असेल. दिलशान मधुशंकाची भर पडल्याने गोलंदाजी आक्रमणात काहीसा दिलासा मिळेल, मात्र संघाला अनुभव आणि सातत्याची गरज आहे.