KL Rahul set world record in IPL : आयपीएल २०२६ मधील ५१ व्या सामन्यात शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळाली. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात दिल्लीचा स्टार फलंदाज केएल राहुलने (KL Rahul) बॅटिंग करताना असा एक विक्रम प्रस्थापित केला आहे, जो आजवर आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही फलंदाजाला जमलेला नाही. तीन वेगवेगळ्या संघांसाठी एक हजार धावांचा विक्रम केएल राहुलने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात १४ चेंडूत २३ धावांची खेळी केली. ही खेळी लहान असली तरी याद्वारे त्याने दिल्ली कॅपिटल्ससाठी आपल्या १,००० धावा पूर्ण केल्या. यासह केएल राहुल आयपीएलमध्ये तीन वेगवेगळ्या फ्रँचायझींकडून (संघांकडून) प्रत्येकी १,००० पेक्षा जास्त धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. राहुलने यापूर्वी पंजाब किंग्ससाठी २,५४८ धावा आणि लखनौ सुपर जायंट्ससाठी १,४१० धावा कुटल्या आहेत. A record that defines consistency across franchises 🔥🏏 KL Rahul becomes the first player in IPL history to score 1000+ runs for three different franchises 👏👑 Different teams, same run machine 💥#IPL2026 #KLRahul #SKC pic.twitter.com/6gHU9xRskn — Sportskeeda (@Sportskeeda) May 8, 2026 ऋषभ पंतचा मोडला जुना विक्रम KL Rahul became the first player in IPL history to score 1000+ runs for three different franchises. 2548 runs for PBKS 1410 for LSG 1007* for DC*#IPL #KLRahul #DCvsKKR pic.twitter.com/5etIPDNxXW — CREX (@Crex_live) May 8, 2026 केएल राहुलने केवळ १००० धावांचा टप्पाच गाठला नाही, तर दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वात वेगवान १,००० धावा पूर्ण करणारा तो फलंदाज ठरला आहे. त्याने ही कामगिरी आपल्या अवघ्या २३ व्या डावात केली. यापूर्वी हा विक्रम ऋषभ पंतच्या नावावर होता, ज्याने ३५ डावांत हा टप्पा गाठला होता. राहुलने पंतचा हा विक्रम मोडीत काढून दिल्लीच्या इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरले आहे. हेही वाचा – Pathum Nissanka Record : पाथुम निस्संकाची ऐतिहासिक कामगिरी; १३ वर्षांनंतर श्रीलंकन खेळाडूने केला ‘हा’ खास पराक्रम! दिल्लीची फलंदाजी आणि बदलांचे सत्र – नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या दिल्लीसाठी केएल राहुल आणि पाथुम निस्संका यांनी ४९ धावांची सलामी दिली. निस्संकाने २९ चेंडूत ५० धावांची वादळी खेळी केली, ज्यात ५ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. मात्र, मध्यफळीत नितीश राणा (८), समीर रिझवी (३) आणि ट्रिस्टन स्टब्स (२) स्वस्तात बाद झाल्याने दिल्लीचा डाव काहीसा अडखळला. यानंतर आशुतोष शर्माने २८ चेंडूत ३९ धावांची खेळी साकारत दिल्लीला २० षटकांत ८ बाद १४२ धावांपर्यत मजल मारुन दिली.