DC vs RR Delhi Capitals won by 5 Wickets IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या ६२ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव करत अत्यंत महत्त्वाच्या विजयाची नोंद केली आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीने राजस्थानचा ५ विकेट्सनी धुव्वा उडवला. या सलग तिसऱ्या पराभवामुळे राजस्थानचा प्लेऑफ्समध्ये पोहोचण्याचा मार्ग खडतर झाला आहे. कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. एकवेळ राजस्थानचा संघ सहज २०० धावांचा टप्पा ओलांडेल असे वाटत होते, परंतु दिल्लीच्या गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन करत राजस्थानला ७ बाद १९३ धावांवर रोखले. या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना केएल राहुल आणि अभिषेक पोरेल यांच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर दिल्लीने ४ चेंडू आणि ५ गडू राखून विजय साकारला. Ashutosh Sharma dials 6️⃣ 📞 @DelhiCapitals dial in 2⃣ points ✅ They remain alive in the Race for the Playoffs 💙❤️ Scorecard ▶️ https://t.co/JwHkQQ1ayi #TATAIPL | #KhelBindaas | #DCvRR pic.twitter.com/g44IaiOCqr — IndianPremierLeague (@IPL) May 17, 2026 पराग बाद होताच राजस्थानची घसरण – 2⃣3⃣-run over 🤯 Relive Riyan Parag’s clean striking ▶️ https://t.co/xVUTyruju7 #TATAIPL | #KhelBindaas | #DCvRR pic.twitter.com/Qsnk36e5V4 — IndianPremierLeague (@IPL) May 17, 2026 राजस्थान रॉयल्सची सुरुवात अत्यंत वेगवान झाली होती. १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार रियान पराग यांनी दिल्लीच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच हल्ला चढवला. त्यांच्या धुवांधार फलंदाजीमुळे राजस्थानने १३ व्या षटकातच १५० धावांचा टप्पा ओलांडला होता. मात्र, १५ व्या षटकात १६० पेक्षा जास्त धावसंख्या असताना कर्णधार रियान पराग बाद झाला आणि सामन्याचे चित्र बदलले. परागच्या पाठोपाठ इतर फलंदाजांना धावांचा वेग राखता आला नाही, ज्याचा फटका संघाला बसला आणि राजस्थानला २०० धावांचा टप्पा गाठता आला नाही. मिचेल स्टार्कची ‘चौकार’ गोलंदाजी – Early success for #DC 🥳 Yashasvi Jaiswal departs ☝️ Updates ▶️ https://t.co/JwHkQQ1ayi #TATAIPL | #KhelBindaas | #DCvRR pic.twitter.com/OMS1HIhpWJ — IndianPremierLeague (@IPL) May 17, 2026 रियान पराग बाद झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी सामन्यावर पूर्ण पकड मिळवली. दिल्लीसाठी अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने सर्वाधिक ४ विकेट्स घेत राजस्थानच्या मधल्या फळीचे कंबरडे मोडले. त्याला लुंगी एन्गिडी आणि युवा गोलंदाज माधव तिवारी यांनी सुरेख साथ दिली. एन्गिडीने ४ षटकांत अवघ्या ६ च्या इकॉनॉमीने धावा देत २ विकेट्स घेतले, तर माधव तिवारीने ६.८० च्या इकॉनॉमीने २ फलंदाजांना बाद केले. कर्णधार अक्षर पटेलला विकेट मिळाली नसली, तरी त्याने ४ षटकांत फक्त ३१ धावा देऊन राजस्थानच्या धावगतीला लगाम घातला. हेही वाचा – Rishabh Pant : ऋषभ पंतची उपकर्णधारपदावरून हकालपट्टी होणार? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! वैभव, रियान आणि ध्रुवची झुंज ठरली व्यर्थ – Innings Break! A superb comeback by #DC to restrict #RR to 193 🎯 2⃣ points loading for? 🤔 Scorecard ▶️ https://t.co/JwHkQQ1ayi #TATAIPL | #KhelBindaas | #DCvRR pic.twitter.com/cgAvLfSySW — IndianPremierLeague (@IPL) May 17, 2026 राजस्थानसाठी वैभव सूर्यवंशीने अवघ्या २१ चेंडूंत ३ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ४६ धावांची वेगवान खेळी केली. तर कर्णधार रियान परागने २६ चेंडूंत ५ षटकार आणि ३ चौकार ठोकत ५३ धावांची आक्रमक खेळी साकारली. याशिवाय मध्यक्रमात ध्रुव जुरेलने ४० चेंडूंत ५३ धावांचे योगदान दिले. मात्र, या तिघांशिवाय राजस्थानच्या इतर कोणत्याही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकून मोठी धावसंख्या उभारता आली नाही, ज्यामुळे संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारूनही पराभवाचा सामना करावा लागला.