IPL 2025 Winner : कोण होणार IPL 2025 चा विजेता? ‘या’ दिग्गज खेळाडूने वर्तवले भाकीत

आयपीएल 2025 या क्रीडा स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. तर फायनल मॅच 25 मे रोजी खेळवली जाणार आहे. आयपीएल 2025 चा हा यंदाचा 18 वा सिझन असणार आहे. आयपीएल सुरू व्हायला अजून वेळ आहे मात्र या अगोदर ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज वेगवान गोलंदाज ब्रेट लीने मोठी भविष्यवाणी केली आहे.
काय म्हणाले ब्रेट ली?
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यापैकी कोणती टीम सहावे आयपीएल विजेतेपद मिळवेल, याबद्दल ब्रेट लीने आपले मत व्यक्त केले आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना ब्रेट ली म्हणाला, मुंबई इंडियन्स सीएसकेपूर्वी सहावे आयपीएल विजेतेपद मिळवणार. हे पहिल्या सहा सामन्यांवर अवलंबून आहे. मुंबई इंडियन्ससोबत गेल्या चार-पाच वर्षांत जे घडले आहे, ते सुरुवातीचे चार-पाच सामने हरतात. आता मुंबई इंडियन्सला हे बदलावे लागेल.
ही एक अशी प्रथा आहे जी तुम्हाला सतत बघायला आवडणार नाही, त्यामुळे मला वाटते की जर मुंबई इंडियन्सने चांगली सुरुवात केली आणि पहिले सहा सामने जिंकले, तर त्यांना आघाडी मिळेल. क्रिकेटमध्ये प्रत्येक सामना जिंकणे आवश्यक नाही, तुम्हाला माहित आहे की प्लेऑफमध्ये पोहोचण्यापूर्वी चार-पाच सामने जिंकावे लागतात, त्यामुळे मला वाटते की मुंबई इंडियन्सने असे केल्यास ते सहावे विजेतेपद मिळवू शकतात.
आयपीएल स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांच्या नावावर सर्वाधिक विजेतेपद आहेत. या दोन्ही संघांनी प्रत्येकी 5 विजेतेपद मिळवली आहेत. तर कोलकाता नाईट रायडर्सच्या नावावर 3 विजेतेपद आहेत. राजस्थान रॉयल्स, सनराईज हैद्राबाद, डेक्कन चार्जस, गुजरात टायटन्स या संघानी प्रत्येकी 1 विजेतेपद पटकावले आहे. तर आरसीबी, लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्लीच्या संघाला अद्याप एकही विजेतेपद मिळवता आलेले नाही.





