IPL 2024 (Rajasthan Royals) : …तर राजस्थान रॉयल्सचा संघ ‘प्ले ऑफ’मधून पडू शकतो बाहेर..! जाणून घ्या, समीकरण

IPL 2024 (Rajasthan Royals) : क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि जेव्हा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटचा विचार केला जातो तेव्हा तो चढ-उतारांनी भरलेला खेळ आहे. शेवटचे तीन सामने सोडले तर संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स संघ अजिंक्य वाटत होता. 9 सामन्यांमध्ये एका पराभवासह त्यांचा संघ टेबल टॉपर होता. त्यांच्याविरुद्ध खेळायला आलेले सर्व संघ पराभूत झाले होते.
सलग तीन सामने हरण्यापूर्वी त्याचा खेळ असा होता की, त्यांना पराभूत करण्यासाठी आता आयपीएल प्लेइंग इलेव्हनला त्याच्याविरुद्ध मैदानात उतरावे लागेल. मात्र, मागील सलग तीन सामने पराभूत झालेला संजू सॅमसनचा राजस्थान संघ हा सध्या प्लेऑफसाठी संघर्ष करत आहे.
संजू सॅमसनचा संघ 16 गुण आणि +0.349 च्या निव्वळ धावगतीने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. केकेआर (KKR) संघ पहिल्या क्रमांकावर असून त्यांचे 18 गुण आहेत. RR (राजस्थान रॉयल्स) संघाने मागील तीन सामने गमावले आहेत. अशा स्थितीत त्यांना प्ले ऑफमधून बाहेर पडण्याचा धोका आहे. मागील तीन सामन्यांमध्ये, राजस्थान हा सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध एक धावेने, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 20 धावांनी आणि चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध 5 विकेट्सने पराभूत झाला आहे. अशा परिस्थितीत आरआर (राजस्थान रॉयल्स) संघाला एक सामना जिंकून प्लेऑफसाठी जागा निश्चित करायची आहे.
राजस्थान रॉयल्सला प्ले ऑफमधून बाहेर पडण्याचा धोका…
जर राजस्थान रॉयल्स संघाने आपले दोन्ही सामने (RRvsPBKS आणि RRvsKKR) मोठ्या फरकाने गमावले तर त्याचे गुण 16 च राहतील आणि एलएसजीने आपले दोन्ही सामने (LSGvsDC आणि LSGvsMI) मोठ्या फरकाने जिंकले तर त्याचे गुण 16 होतील त्याचवेळी, जर हैदराबादने आपले दोन्ही सामने (SRHvsGT आणि SRHvsPBKS) जिंकले तर त्याचेही गुण 18 होतील आणि CSK ने शेवटचा सामना जिंकला, तर त्याचेही गुण 16 होतील आणि संजूचा राजस्थान संघ नेट रनरेटच्या आधारे प्लेऑफमधून बाहेर पडू शकतो.
राजस्थान रॉयल्स ‘या’ तीन खेळाडूंना देऊ शकते संधी….
राजस्थान रॉयल्सच्या पुढील दोन सामन्यांपैकी एक पंजाब किंग्ज आणि दुसरा केकेआर विरुद्ध आहे. राजस्थानसाठी कोणताही सामना सोपा होणार नाही. राजस्थान रॉयल्स संघाला यापैकी एक सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल. अशा परिस्थितीत संजू सॅमसन या दोन्ही सामन्यांसाठी रोमेन पॉवेल, केशव महाराज आणि शिमरॉन हेटमायर या तीन खास खेळाडूंना मैदानात उतरवू शकतो, जे संघाला प्लेऑफमध्ये पोहचवण्यास मदत करतील.





