IPL 2024, Delhi Capitals : आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सची स्थिती आधीच वाईट आहे आणि आता या संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू मिचेल मार्श दुखापतीमुळे आयपीएलच्या 17व्या हंगामातून बाहेर पडला आहे. दुखापतीनंतर गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियात परतल्याने मार्श गेल्या काही सामन्यांमध्ये सहभागी झाला नव्हता. आता, उर्वरित सामन्यांसाठी तो भारतात परतणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मिचेल मार्श संपूर्ण हंगामासाठी बाहेर… ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा भाग आहे, परंतु आता तो उर्वरित हंगामातून बाहेर झाला आहे. मार्शला आयपीएलदरम्यान हॅमस्ट्रिंगची समस्या होती, त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाला परतला. खरे तर जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराची भूमिका बजावण्यास तयार असलेल्या मार्शला दिल्ली संघ व्यवस्थापनाशी चर्चा करून परत पाठवण्यात आले आहे. आयपीएल 2024 मध्ये 3 एप्रिल रोजी कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध त्याने दिल्लीसाठी शेवटचा सामना खेळला. तेव्हापासून तो संघाबाहेर आहे. त्या सामन्यात त्याने 1 बळी घेतला. याशिवाय मार्शच्या या मोसमातील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्याने पंजाबविरुद्ध 20, राजस्थानविरुद्ध 23 आणि चेन्नईविरुद्ध 18 धावा केल्या. मिचेल मार्श आगामी T-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. अशा परिस्थितीत क्रिकेट ऑस्ट्रेलियाला त्याच्या फिटनेसबाबत कोणताही धोका पत्करायचा नाही. IPL 2024 : आरसीबीचा संघ अजूनही प्लेऑफसाठी ठरू शकतो पात्र ? जाणून घ्या, 7 सामने हरल्यानंतर काय आहे गणित… दिल्लीची अवस्था आहे वाईट … आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सची स्थिती खराब होत आहे. फ्रँचायझीने आतापर्यंत खेळलेल्या 8 सामन्यापैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत. तर 5 सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. अशाप्रकारे हा संघ 6 गुणांसह गुणतालिकेत 8व्या स्थानावर आहे. दिल्लीने सलग 4 सामने गमावले आहेत. आता ऋषभ पंतच्या संघाने लवकर पुनरागमन केले नाही तर त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचणे जवळपास अशक्य होईल.