नवी दिल्ली – यंदाचा आयपीएलच्या 16 व्या मोसमाची सुरुवात 31 मार्चपासून होणार असून, 28 मे दरम्यान अंतिम सामना खेळवला जाणार आहे. हे सर्व सामने देशांतर्गत होणार आहेत. आयपीएलच्या सामन्यासाठी सर्व संघ सज्ज झाल्याचं देखील पाहायला मिळालं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुंबई इंडियन्सच्या संघाने आपली नवी-कोरी जर्सी समोर आणली होती.
Rajasthan Royals training jersey for IPL 2023. pic.twitter.com/WOS6eHK3lK
— Johns. (@CricCrazyJohns) March 21, 2023
त्यानंतर मुंबई पाठोपाठ आता राजस्थान रॉयल्स संघानंही आपली नवी जर्सी लॉन्च केली आहे. ही जर्सी मागील वर्षीच्या कलर्समध्येच असली तरी त्यात काही खास गोष्टी आहेत. जसंकी जर्सीची डिझाईन ही राजस्थानची स्थानिक कल्चर सादर करणारी दिसत आहे. या जर्सीचा रंग गुलाबी असून, त्यावर आकर्षक डिझाईन देखील तयार करण्यात आले आहेत.
A nod to the past. A stride into the future. Our #IPL2023 jersey and its story. 💗👕
Pre-order on: https://t.co/MR9ukt0nI9 pic.twitter.com/qtE4BdkGaj
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 21, 2023
राजस्थानच्या अधिकृत ट्विटर आकाउंटवरून या जर्सी बद्दल माहिती देण्यात आली आहे. राजस्थान रॉयल्सच्या चाहत्यांना देखील संघाची ही नवीन जर्सी आवडली असून, ते देखील यावर आपली प्रतिक्रिया देत आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्स त्यांच्या आयपीएल 2023 मोहिमेला 2 एप्रिल रोजी हैदराबादमध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्याने सुरुवात करणार आहेत. दुपारी 3.30 वाजता हा सामना सुरू होईल.