iPhone 17 Discount: आयफोन 17 फक्त 38000 रुपयांत मिळतोय; जाणून घ्या कसा

iPhone 17 Discount: नवीन आयफोन घेण्याचा विचार करताय? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे! नवीन आयफोन १७ आता केवळ ३८,००० रुपयांत मिळू शकतो. कसे? चला जाणून घेऊया या खास ऑफरबद्दल सविस्तर.
एक्सचेंज ऑफरची कमाल –
अॅपलने आयफोन १७ चे अनेक व्हेरिएंट्स लॉन्च केले असून त्यांच्या किंमती वेगवेगळ्या आहेत. आयफोन १७ ची भारतातील किंमत ८२,९०० रुपये आहे. पण जर तुम्ही हा फोन फ्लिपकार्टवरून खरेदी केला तर तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळेल. तुमचा जुना फोन एक्सचेंज केल्यास २५,००० ते ३०,००० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.
HDFC कार्डचा फायदा –
याशिवाय, जर तुम्ही HDFC Infinia Metal Card वापरलं तर प्रत्येक १५० रुपये खर्चावर ५ रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील. म्हणजेच, ८२,९०० रुपये खर्च केल्यास तुम्हाला १९,९९६ रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील, ज्याची किंमत सुमारे २०,००० रुपये आहे. या कार्डमुळे तुम्हाला मोठी बचत होणार आहे.
३८,००० पेक्षा कमी किंमतीत आयफोन १७ –
जर तुम्हाला एक्सचेंज ऑफरमधून २५,००० रुपये आणि HDFC Infinia Metal Card द्वारे २०,००० रुपये सूट मिळाली, तर तुमची एकूण बचत ४५,००० रुपये होईल. यामुळे आयफोन १७ तुम्हाला फक्त ३७,९०० रुपयांत मिळेल.
भारतात आयफोन १७ च्या व्हेरिएंट्सच्या किंमती –
| मॉडेल | स्टोरेज | किंमत (भारतीय रुपये) |
|---|---|---|
| iPhone 17 | 256GB | ₹82,900 |
| 512GB | ₹1,02,900 | |
| iPhone 17 Pro | 256GB | ₹1,34,900 |
| 512GB | ₹1,54,900 | |
| 1TB | ₹1,74,900 | |
| iPhone 17 Pro Max | 256GB | ₹1,49,900 |
| 512GB | ₹1,69,900 | |
| 1TB | ₹1,89,900 | |
| 2TB | ₹2,29,900 | |
| iPhone Air | 256GB | ₹1,19,900 |
| 512GB | ₹1,39,900 | |
| 1TB | ₹1,59,900 |





