पाच दिवसांत शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे तब्बल 16.97 लाख कोटी रुपये बुडाले
Updated On:

मुंबई – गेल्या पाच दिवसात शेअर बाजाराचे निर्देशांक तीन टक्क्यांनी कोसळले आहेत. त्यामुळे शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य या पाच दिवसात तब्बल 16.97 लाख कोटी रुपयांनी कमी होऊन 408 लाख कोटी रुपये म्हणजे 4.70 लाख कोटी डॉलरवर आले आहे.
ऑक्टोबरपासून मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स जवळजवळ दहा हजार अंकांनी कोसळला आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार भांबावले असून सुरक्षित वित्तीय साधनाचा पर्याय शोधत असल्याचे ब्रोकर्सनी सांगितले. गेल्या पाच दिवसात सेन्सेक्स 2,290 अंकांनी म्हणजे तीन टक्क्यांनी कोसळला आहे. मंगळवारी सेन्सेक्स 1,018 अंकांनी म्हणजे 1.32% कोसळला. रुपयाही याच प्रमाणात कोसळत आहे. यातून सध्या तर मार्ग दिसत नाही असे काही ब्रोकरनी बोलून दाखविले.




