Stock Market: शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 4 दिवसांत 11.28 लाख कोटी रुपयांचे नुकसान
Updated On:

मुंबई – शेअर बाजाराचे निर्देशांक एकतर्फी कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांचे चार दिवसात 11.28 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सोमवारीही शेअर बाजार निर्देशांकांत अडीच टक्क्यांची घट झाली. त्यामुळे मुंबई शेअर बाजारावर नोंदलेल्या सर्व कंपन्यांचे एकत्रित मूल्य 11.28 लाख कोटी रुपयांनी कमी होऊन 241 लाख कोटी रुपये झाले. गेल्या चार दिवसांमध्ये सेन्सेक सहा टक्क्यांनी कोसळला आहे.
जागतिक पातळीवरील तणावाच्या परिस्थितीमुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून विक्री करीत आहेत. त्याचबरोबर भरतात महागाई वाढण्याची शक्यता असल्यामुळे गुंतवणूकदार अस्वस्थ आहेत. एकीकडे शेअर बाजाराचे निर्देशांक कमी होत असताना सोन्याच्या दरामध्ये वाढ होत आहे. त्याचबरोबर रुपयाचे मूल्य वेगाने कमी होत आहे. त्यामुळे व्याजदरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.




