Pune district : मुळशीत राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या मुलाखती

पिरंगुट : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. आमदार शंकर मांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या मुलाखती संपन्न झाल्या. सहा गणासाठी एकूण ३३ इच्छुकांनी तर ३ गटासाठी एकूण १२ इच्छुकांनी यावेळी मुलाखती दिल्या.
घोटावडेफाटा (ता. मुळशी) येथील सुंदरबन मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संवाद मेळावा तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी समर्थकांसह शक्तीप्रदर्शन केले.
समर्थकांनी दिलेल्या घोषणेने परिसर दणाणून निघाला होता. तालुक्यात या निवडणूक तयारीत राष्ट्रवादीने आघाडी घेतल्याचे पाहायला मिळाले. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मुळशी तालुक्यात जिल्हा परिषदेचे तीन गट तर पंचायत समितीचे सहा गण आहे. आरक्षण सोडत जाहीर होण्याअगोदरच अनेकांनी निवडणूक लढवण्याच्या तयारीनेच कामाला सुरुवात देखील केली होती.
आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी मतदारांशी संवाद देखील साधला आहे. गणेशोत्सवापासून आतापर्यंत अनेक कार्यक्रम घेतले आहे. मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या या मेळाव्यामध्ये पौड गणातून चार इच्छुक उमेदवारांनी, अंबडवेट गणातून नऊ, माण आणि हिंजवडी गणातून प्रत्येकी चार तर पिरंगुट गणातून सात आणि भुगाव गणातून पाच उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत.
पौड-अंबडवेट जिल्हा परिषद गटातून तीन, माण-हिंजवडी जिल्हा परिषद गटातून चार तर पिरंगुट – भूगाव जिल्हा परिषद गटातून पाच इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत, अशी माहिती मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अंकुश मोरे यांनी दिली. यावेळी विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेश मारणे यांनी केले. स्वागत सुखदेव मांडेकर यांनी केले. प्रास्ताविक अंकुश मोरे यांनी केले. आभार निलेश पाडाळे यांनी मानले.
गण व गटनिय इच्छुक उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे
पौड – अंबडवेट जिल्हा परिषद गट
रवींद्र कंधारे, मिलिंद वाळंज, किसन नागरे
पौड पंचायत समिती गण
काजल मोरे, पूनम सुर्वे, सोनल शेंडे, वर्षा राऊत,
अंबडवेट गण
सचिन अमराळे, चेतन फाले, प्रवीण धनवे, संतोष पेरणेकर, बबन धिडे, किसन नागरे, शशिकांत नागरे, विलास अमराळे, राजेंद्र नागरे
माण – हिंजवडी जिल्हा परिषद गट
नंदूशेठ भोईर, सागर साखरे, विलास साखरे, अर्जुन देवकर
माण पंचायत समिती गण
मंदा शेळके, निकिता रानवडे, प्रमिला जाधव, पायल रानवडे
हिंजवडी पंचायत समिती गण
विद्या जाधव, नलिनी वाघमारे, प्रणाली वाघमारे, सुवर्णा जोंजाळे
पिरंगुट जिल्हा परिषद गट
शंकर मरगळे, शांताराम इंगवले, राजेंद्र कुदळे, संजय सातव, लक्ष्मण मरगळे
पिरंगुट पंचायत समिती गण
रमेश पवळे, मोहन निकटे, महादेव गोळे, रामदास गोळे, सुनील वाडकर, सर्जेराव तांगडे, शंकर मरगळे
भुगाव पंचायत समिती गण
राजेंद्र दबडे, पंकज हरपुडे, सचिन आंग्रे, कैलास चोंधे शंकर पवळे





