\nयोग दिनाच्या निमित्ताने प्रत्येक देश, समाज निरोगी राहावा असे सांगत मोदींनी एकमेकांची ताकद बनूयात असे आवाहन केले. योगाने संयमाची शिकवण दिली असल्याचंही यावेळी ते म्हणाले. “करोनाच्या गेल्या दीड वर्षात अनेक देशांनी संकटाचा सामना केला आहे. लोक योगाला विसरु शकत होते पण त्याउलट लोकांमध्ये योगाचा उत्साह, प्रेम अजून वाढलं आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात अनेकांनी योगाला सुरुवात केली आहे,” असे मोदी म्हणाले.

\n

“करोनाच्या अदृश्य व्हायरसने जगात धडक दिली तेव्हा कोणताही देश संसाधनं तसंच मानसिकदृष्ट्या यासाठी तयार नव्हता. अशा कठीण काळात आत्मशक्ती महत्वाचा मार्ग ठरला. मी आरोग्य कर्मचाऱ्यांशी बोलतो तेव्हा योगालाही सुरक्षा कवच केल्याचं ते सांगतात. डॉक्टरांनी स्वत: आणि रुग्णांसाठी योगाचा वापर केला. आजारातून बाहेर पडल्यानंरही योगा महत्वाचा आहे,” असे मोदींनी यावेळी सांगितले.

\n

“योगामुळे फक्त शारिरीकच नाही तर मानसिक आरोग्य सदृढ होण्यासही मदत मिळते. योग आपल्याला तणावातून सामर्थ्याकडे नेत आहे. योग आपल्याला नकारात्मकतेतून क्रिएटिव्हीटीकडे नेत आहे. बाहेर कितीही संकट असलं तरी आपल्याकडे तोडगा असल्याचे योगा सांगत आहे,” असे मोदी म्हणाले.

\n

“जेव्हा भारताने योग दिनाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा ते संपूर्ण जगासाठी उपलब्ध व्हावं अशी अपेक्षा होती. आज त्या दिशेने अजून एक पाऊल टाकत भारताने संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेसोबत मिळून ‘MYoga’ अॅप आणलं आहे. कॉमन योगा प्रोटोकॉलच्या अंतर्गत वेगवेगळ्या भाषेतील व्हिडीओ येथे उपलब्ध होतील. यामुळे जगभरात योगाचा विस्तार होण्यासाठी तसंच जगाला एकत्र आणण्यात महत्वाची भूमिका निभावली जाईल,” असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.

\n

यंदा योग दिनाची थीम ‘योग फॉर वेलनेस’ आहे, जी शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगाभ्यास करण्यावर केंद्रित आहे. करोना संसर्गामुळे यंदाही योग दिनाचे कार्यक्रम व्हर्च्युअल आयोजित करण्यात आले आहेत

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"International Yoga Day: “योगाने लोकांमध्ये करोनाशी लढण्याचा विश्वास निर्माण केला”-पंतप्रधान","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/06/modi-4.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Kiran Dixit","url":"https://www.dainikprabhat.com/author/kirandixit/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/international-yoga-day-yoga-builds-faith-among-people-to-fight-corona-pm#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/06/modi-4.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/international-yoga-day-yoga-builds-faith-among-people-to-fight-corona-pm#webpage","name":"International Yoga Day: “योगाने लोकांमध्ये करोनाशी लढण्याचा विश्वास निर्माण केला”-पंतप्रधान","url":"https://www.dainikprabhat.com/international-yoga-day-yoga-builds-faith-among-people-to-fight-corona-pm","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/international-yoga-day-yoga-builds-faith-among-people-to-fight-corona-pm#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/06/modi-4.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/international-yoga-day-yoga-builds-faith-among-people-to-fight-corona-pm#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/international-yoga-day-yoga-builds-faith-among-people-to-fight-corona-pm","name":"International Yoga Day: “योगाने लोकांमध्ये करोनाशी लढण्याचा विश्वास निर्माण केला”-पंतप्रधान"}}]}}}

International Yoga Day: “योगाने लोकांमध्ये करोनाशी लढण्याचा विश्वास निर्माण केला”-पंतप्रधान

Updated On:
International Yoga Day: “योगाने लोकांमध्ये करोनाशी लढण्याचा विश्वास निर्माण केला”-पंतप्रधान

नवी दिल्ली : आज आंतरराष्ट्रीय योग्य दिवस जगभरात साजरा करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी करोना संकटात योगाचं महत्व सांगितले. योगाने लोकांमध्ये करोनाशी लढण्याचा विश्वास निर्माण केला असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

योगामुळे निरोगी आयुष्य, सामर्थ्य आणि सुखी जीवन मिळते असेही यावेळी त्यांनी सांगितले. सुखी आयुष्यासाठी योगा महत्वाचा असल्याचे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. “आज जेव्हा संपूर्ण जग करोनाशी लढत आहे तेव्हा योगा लोकांसाठी आशेचा किरण ठरत आहे. भारतात कोणताही मोठा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नसला तरी योग दिनाचा उत्साह कमी झालेला नाही. करोना असतानाही योग दिवसाची थीम ‘योगा फॉर वेलनेस’ने करोडो लोकांमध्ये योगाप्रती उत्साह वाढवला आहे,” असे  नरेंद्र मोदींनी सांगितले.

योग दिनाच्या निमित्ताने प्रत्येक देश, समाज निरोगी राहावा असे सांगत मोदींनी एकमेकांची ताकद बनूयात असे आवाहन केले. योगाने संयमाची शिकवण दिली असल्याचंही यावेळी ते म्हणाले. “करोनाच्या गेल्या दीड वर्षात अनेक देशांनी संकटाचा सामना केला आहे. लोक योगाला विसरु शकत होते पण त्याउलट लोकांमध्ये योगाचा उत्साह, प्रेम अजून वाढलं आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात अनेकांनी योगाला सुरुवात केली आहे,” असे मोदी म्हणाले.

“करोनाच्या अदृश्य व्हायरसने जगात धडक दिली तेव्हा कोणताही देश संसाधनं तसंच मानसिकदृष्ट्या यासाठी तयार नव्हता. अशा कठीण काळात आत्मशक्ती महत्वाचा मार्ग ठरला. मी आरोग्य कर्मचाऱ्यांशी बोलतो तेव्हा योगालाही सुरक्षा कवच केल्याचं ते सांगतात. डॉक्टरांनी स्वत: आणि रुग्णांसाठी योगाचा वापर केला. आजारातून बाहेर पडल्यानंरही योगा महत्वाचा आहे,” असे मोदींनी यावेळी सांगितले.

“योगामुळे फक्त शारिरीकच नाही तर मानसिक आरोग्य सदृढ होण्यासही मदत मिळते. योग आपल्याला तणावातून सामर्थ्याकडे नेत आहे. योग आपल्याला नकारात्मकतेतून क्रिएटिव्हीटीकडे नेत आहे. बाहेर कितीही संकट असलं तरी आपल्याकडे तोडगा असल्याचे योगा सांगत आहे,” असे मोदी म्हणाले.

“जेव्हा भारताने योग दिनाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा ते संपूर्ण जगासाठी उपलब्ध व्हावं अशी अपेक्षा होती. आज त्या दिशेने अजून एक पाऊल टाकत भारताने संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेसोबत मिळून ‘MYoga’ अॅप आणलं आहे. कॉमन योगा प्रोटोकॉलच्या अंतर्गत वेगवेगळ्या भाषेतील व्हिडीओ येथे उपलब्ध होतील. यामुळे जगभरात योगाचा विस्तार होण्यासाठी तसंच जगाला एकत्र आणण्यात महत्वाची भूमिका निभावली जाईल,” असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.

यंदा योग दिनाची थीम ‘योग फॉर वेलनेस’ आहे, जी शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगाभ्यास करण्यावर केंद्रित आहे. करोना संसर्गामुळे यंदाही योग दिनाचे कार्यक्रम व्हर्च्युअल आयोजित करण्यात आले आहेत

आणखी संबंधित बातम्या

Chhagan Bhujbal : "मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही" - छगन भुजबळ

2026-08-23 18:31:57

Chhagan Bhujbal : "मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही" - छगन भुजबळ

Gunaratna Sadavarte : मनोज जरांगेंबद्दल वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा

2026-08-23 17:25:23

Gunaratna Sadavarte : मनोज जरांगेंबद्दल वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा

Shweta Tiwari : "राज ठाकरेंशी संबंध जोडणं हा शुद्ध मूर्खपणा.."; अभिनेत्री श्वेता तिवारीच्या आरोपांवर शालिनी ठाकरे संतापल्या, पोस्ट चर्चेत !

2026-08-23 16:51:13

Shweta Tiwari : "राज ठाकरेंशी संबंध जोडणं हा शुद्ध मूर्खपणा.."; अभिनेत्री श्वेता तिवारीच्या आरोपांवर शालिनी ठाकरे संतापल्या, पोस्ट चर्चेत !

Devendra Fadnavis : "राहुल यांचा महिला सक्षमीकरणाचा मुद्दा ढोंगी" - देवेंद्र फडणवीस

2026-08-23 16:11:36

Devendra Fadnavis : "राहुल यांचा महिला सक्षमीकरणाचा मुद्दा ढोंगी" - देवेंद्र फडणवीस

Teacher slaps student : अपूर्ण गृहपाठामुळे शिक्षिकेने लगावली थप्पड; विद्यार्थ्याचे प्राण गेले !

2026-08-21 17:13:04

Teacher slaps student : अपूर्ण गृहपाठामुळे शिक्षिकेने लगावली थप्पड; विद्यार्थ्याचे प्राण गेले !