मांडवगण फराटा – शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील नामदार श्री शरदचंद्रजी पवार पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा बौद्धिक व व्यक्तीमत्वाचा विकास व्हावा, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बौद्धिक विकास कार्यशाळेस प्रतिसाद मिळाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आशिष काटकर उपस्थित होते. मुलांची एकाग्रता वाढ, व्यक्तीमत्व, ज्ञानेद्रियांचा विकास, मेंदूचा विकास, जीवनातील अडचणी, त्यावर व्यायामाद्वारे एकाग्रता कशी वाढवावी या सर्व गोष्टी विषयी सांगताना व्याख्याते आशिष काटकर यांनी विविध दाखले दिले.
यावेळी मुलांनीही प्रतिसाद दिला. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाचा विकास व्हावा हा उद्देश होता. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव पाटील फराटे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर फराटे पाटील, सचिव मृणाल फराटे पाटील, विश्वस्त धनश्री फराटे पाटील, प्राचार्य संदीप कोकरे उपस्थित होते.