“ई-बसेस ठराविक मुदतीत उपलब्ध करून देण्याच्या सूचना’

पुणे महानगर परिवहन महामंडळ संचालक मंडळाची बैठक

पुणे – पीएमपीएमएल ताफ्यात लवकरच दाखल होणाऱ्या ई-बसेस ठराविक मुदतीत उपलब्ध करून देण्याचे कंपनीला सांगण्यात आले आहे, असा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड येथे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक झाली. पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव, स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडीगेरी, पीएमपीएमएलच्या अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे उपस्थित होते. लवकरच 400 सीएनजी आणि पहिल्या टप्प्यातील 125 इलेक्‍ट्रीक बसेस दाखल होणार आहेत. पीएमपीच्या ताफ्यात सद्यस्थितीत असणाऱ्या 2 हजार बसेसपैकी अनेक बसेस आयुर्मान संपलेल्या आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत बसेसची संख्या कमी असल्याने आयुर्मान संपलेल्या बसेसच्या माध्यमातून संचलन केले जाते. तर, दुसरीकडे नव्या बसेस ताफ्यात लवकरात लवकर दाखल करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.

मात्र, कंपनीकडून मुदतीमध्ये गाड्या उपलब्ध होत नाहीत. मागील काही महिन्यांपासून गाड्या पोहोचण्यास उशीर लागत असल्याने उत्पादक कंपनीला नोटीस बजावण्यात यावी, अशी सूचना संचालक मंडळाने प्रशासनाला केली आहे. चालक, वाहक पदावर कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांना विविध कारणास्तव बडतर्फ केले होते. त्यांनी आपणाला पुन्हा सेवेत घेण्याची मागणी केली होती. यावर बैठकीत प्रशासनाने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावर लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)