पिंपरी | लोणावळा शहरातील खड्डे बुजविण्याच्या सूचना

लोणावळा, (वार्ताहर) – लोणावळा नगरपरिषद हद्दीमध्ये ज्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, ते खड्डे तत्काळ बुजवून घेऊन त्या ठिकाणी डांबर पॅचवर्कचे काम करण्याबाबतच्या सूचना संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांना देण्यात आले आल्या आहेत.
पावसाला सुरवात होताच पर्यटकांची रिघ लोणावळ्याकडे लागते. परिणामी वाहतूक कोंडीत भर पडते. त्यातच रस्ते चांगले असेल तर, प्रवास चांगला होतो. लोणावळा शहरामध्ये प्रवेश केल्यानंतर रेल्वे पूल ते मावळे पुतळा दरम्यान दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी साचत असते. मात्र, शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत.
तसेच ट्रायोज मॉलसमोरील रस्ता, वलवण नांगरगाव रस्ता, बापदेव रोड, शहाणी हॉलिडे होम समोरील रस्त्यावर पावसाचे पाणी साचते. त्यामुळे या भागात योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मागील दोन-तीन दिवसांपासून लोणावळा शहरांमध्ये अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे शहरात रस्त्यांवर कोणत्या भागात पाणी साचू शकते व कोणत्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. प्रशासनाने तत्काळ या सर्व नागरिक भागांची पाहणी करत सर्व खड्डे भरून घेऊन पॅच वरचे काम पूर्ण करावे, अशी मागणी शहरातील नागरिक करत आहेत.





