Imtiaz Jaleel | आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये एमआयएमची जाहीर सभा पार पडली. यावेळी एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. जलील यांनी धर्माच्या नावाखाली हजारो झाडे कापली जात आहेत. कुंभमेळ्यासाठी 25 हजार कोटी रुपये निधी दिला गेला. पण एवढा निधी कशाला? असा थेट सवाल जलील यांनी केला आहे. ‘धार्मिक उत्सवासाठी एवढा मोठा निधी खर्च करण्यापेक्षा त्यातून शाळा किंवा हॉस्पिटल उभारा. हा विषय धर्माच्या चष्म्यातून न पाहता पर्यावरणाच्या आणि विकासाच्या दृष्टीने पाहावा,’ असे आवाहनही त्यांनी केले आहे. धर्माच्या नावाखाली हजारो झाडे कापली जातायत इम्तियाज जलील म्हणाले की, “धर्माच्या नावाखाली हजारो झाडे कापली जात आहेत. कुंभमेळ्यासाठी 25 हजार कोटी रुपये निधी दिला गेला. ठीक आहे, तुमचा उत्सव आहे. पण एवढा निधी कशाला? मी गोपीनाथ मुंडे साहेबांच्या स्मारकासाठी जमीन दिली होती. या राज्यात काही लोक होते जे सर्व धर्म आणि समाजासोबत चालत होते. यात विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे होते. श्रद्धांजली द्यायची असेल तर हॉस्पिटल किंवा शाळा बनवा, स्मारक नाही. Imtiaz Jaleel | भाजपच्या नेत्याचं जे स्मारक बनवलं जात होतं. मी त्या विरोधात कोर्टात गेलो, ज्या ठिकाणी स्मारक होत आहे. त्या ठिकाणी हॉस्पिटल बनवा असे सांगितले. ज्या ठिकाणी भाजप नेत्याचे स्मारक बनत होते, आता त्या ठिकाणी चारशे बेडचे हॉस्पिटल आहे. फडणवीस, अजित पवार ,एकनाथ शिंदे हा देश सर्व धर्म समभाव आहे. जे 25 हजार कोटी रुपये देत आहे. त्यात देशात किती शाळा आणि हॉस्पिटल होतील. आपल्याला शिक्षणावर लक्ष देण्याची गरज आहे,” असे म्हणत त्यांनी कुंभमेळ्याच्या निधीवरून राज्य सरकारवर टीका केली. Imtiaz Jaleel | रोज एक मंत्री आपल्या धर्मावर टोपी आणि दाढीवर बोलतो इम्तियाज जलील पुढे म्हणाले की, “आपल्याला लक्ष्य केले जात आहे. रोज दर्गा, मशिदी लक्ष्य केल्या जात आहेत. रोज एकाचे घर कुठल्या न कुठल्या राज्यात पाडले जात आहे. या देशात आपल्या विरोधात षडयंत्र रचले जात आहे. भाजपने ठरवले आहे की, आपल्याला यांच्याशी काही घेणे देणे नाही. रोज एक मंत्री आपल्या धर्मावर टोपी आणि दाढीवर बोलत आहे. रोज ते आपल्यावर बोलत आहेत. त्यांच्यावर कारवाई होत नाही. आपण काही बोललो तर कारवाई होते. दलित, आदिवासी समाजाचे अनेक जण जेलमध्ये आहेत. कोणी काही बोलले तर आपल्याला ऐकावे लागतयं. आपण एवढ्या वर्षापासून ऐकत आहोत पण, आता ज्या शब्दात बोलणार त्या शब्दात उत्तर देणार,” असा इशारा त्यांनी भर सभेतून दिला. Imtiaz Jaleel | हेही वाचा: लिओनेल मेस्सी आज मुंबईत; ‘प्रोजेक्ट महादेव’चा करणार शुभारंभ