वाघोली : मौजे केसनंद गावची लोकसंख्या अंदाजे 65 हजार असून दिवसेंदिवस वाढत आहे. अष्टविनायक महामार्गसह इतर मार्गावर वाहतूक कोंडी बरोबर अपघाताचे प्रमाण देखील वाढू लागले असून वाढत्या अपघातांचा विचार करून तातडीने गतिरोधक बसवण्याची मागणी आदर्श माजी सरपंच प्रमोद हरगुडे यांनी अष्टविनायक महामार्ग प्रकल्प अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबतीत माजी सरपंच प्रमुख हरगुडे यांनी सांगितले की गावामधील प्रमुख ठिकाणी दररोज तासंतास वाहतूक कोंडी होत असल्या कारणाने तसेच मुख्य द्रुतगती मार्गावर वारंवार अपघात होत असले कारणाने प्रमुख ठिकाणी ब्लिंकर्स आणि गतिरोधक बसविण्यात यावेत.जोगेश्वरी हायस्कूल, केसनंद-वाघोली रोड,छ. शिवाजी महाराज चौक, केसनंद जोगेश्वरी मंदिर, केसनंद-लोणीकंद रोड, जाधव वस्ती, केसनंद-थेऊर रोड सद्गुरू पार्क, केसनंद-लोणीकंद रोड, ऑप्टीमा हाईट्स, केसनंद-थेऊर रोड गायकवाड वस्ती, केसनंद-थेऊर रोड, एच पी पेट्रोल पंप, केसनंद-थेऊर रोड पाटील वस्ती, केसनंद-थेऊर रोड, केसनंद-कोलवडी शिवरस्ता यांचा समवेश आहे.
गतिरोधक नसल्याने अष्टविनायक महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढू लागले असून यात जखमींचे देखील प्रमाण वाढू लागले आहेत. त्यामुळे तातडीने गतिरोधक व इतर उपाययोजना कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचे इशारा आदर्श माजी सरपंच प्रमोद हरगुडे यांनी दिला आहे.