पुणे जिल्हा : झेंडेवाडी पालखीतळाची पाहणी
Updated On:

जिल्हाधिकारी यांच्याकडून विविध विभागांना सूचना
नारायणपूर : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी झेंडेवाडी (ता. पुरंदर) येथील पालखी विसाव्याची
पाहणी केली.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, तहसीलदार रूपाली सरनोबत, पोलीस निरीक्षक अविनाश घोलप, पोलीस निरीक्षक धनंजय माने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोणपे यांनी पाहणी केली.
यावेळी मंडल अधिकारी राजाराम भामे, तलाठी स्नेहा कांबळे, सुधीर गिरमे, ग्रामसेवक रश्मी सांगळे, झेंडेवाडीच्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते, अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य अमर झेंडे यांनी दिली.





