भाईजान सलमान खानच्या सिकंदरची वेगळी क्रेझ प्रेक्षकांमध्ये आहे. आता सिंकदराचा दुसरा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या टीझरला सलमानाचे चाहते भरभरून दाद देत आहे. सलमानचा सिंकदर हा बहुप्रतिक्षित चित्रपट असल्याचे सांगितले जाते. या वर्षीच्या ईदच्या दिवशी सिंकदर देशभरातील थिएटर्समध्ये रिलीज करण्यात येणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या टीझरमध्ये सलमानची केवळ एन्ट्री आणि डायलॅाग दाखवण्यात आले होते. या नव्या टीझरमध्ये सलमान अॅक्शन अवतार पाहायला मिळत आहे. तर नॅशनल क्रश रश्मिकाची पहिली झलक टीझरमध्ये दाखवण्यात आली आहे. रश्मिका पहिल्यांदाच सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे, यामुळे सिंकरदची मोठी उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ए.आर.मुरुगदॉस यांनी केले आहे. सिंकरदरच्या दुसऱ्या धमाकेदार टीझरमध्ये सलमान आणि रश्मिकाची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. सलमान खानच्या वाढदिवशी सिकंदर चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज करण्यात आला होता. पण आता रिलीज करण्यात आलेला दुसरा टीझर जबरदस्त आहे. सिंकदर चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाची जोरदार चर्चा करण्यात येत आहे. थोडक्यात सिंकदरने रिलीजआधीच प्रेक्षकांमध्ये क्रेझ निर्माण केली आहे. सिकंदरच्या पहिल्या टीझरमध्ये फक्त सलमान खानचे अॅक्शन सीन्स पाहायला मिळाले होते. याही टीझरमध्ये सलमानाचा अॅक्शनपॅक्ट अवतार दाखवण्यात आला आहे. पहिल्या टीझरमध्ये सुना है बहुत सारे लोग मैरे पिछे पडे है बस मेरे मुडने की दैर है, हा डॅायलॅाग दाखवण्यात आला होता. दुसऱ्या टीझरमध्येही कायदे मै रहो फायदे आवो असा एक डॅायलॅाग आहे. या टीझरमध्ये रश्मिकाचाही क्यूट अंदाज दिसत आहे. सिंकदर साजिद नादियाडवाला यांनी सादर केला आहे. चित्रपटाचा टीझर रिलीज होताच आतापर्यंत तब्बल १९ मिलियन्स व्ह्यूज टीझरला मिळाले आहेत.