पाकिस्तानातील दहशतादी घटनांमध्ये 21 टक्के घट

इस्लामाबाद – पाकिस्तानातील दहशतवादी घटनांमध्ये सन 2018 या वर्षात त्याच्या मागील वर्षाच्या तुलनेत 21 टक्के घट झाल्याचे या संबंधातील आकडेवारीनुसार दिसून येते. नॅशनल काऊंटर टेररीझम ऍथॉरिटी यांनी सन 2018 सालचा जो अहवाल सादर केला आहे त्यात हीं माहिती देण्यात आली आहे. सन 2017 मध्ये पाकिस्तानात दहशतवादाशी संबंधीत एकूण 741 घटना घडल्या होत्या तर सन 2018 मध्ये हेच प्रमाण 584 इतके राहिले.

इस्लामाबाद आणि पंजाब मध्ये या घटनांमध्ये याच काळात सुमारे 50 टक्‍के इतकी घट झाली आहे. तर सिंध मधील दहशतवादी घटनांमध्ये 80 टक्के इतकी घट झाली आहे. सन 2018 मध्ये पाकिस्तानातील दहशतवादी घटनांमध्ये एकूण 517 लोक ठार झाले होते. त्यातील बहुतांशी घटना बलुचिस्तान आणि आसपाच्या भागात घडल्या आहेत. या वर्षात
खैबर पख्तुनवा प्रांतात 59 जण, पंजाब प्रांतात 15 ते सिंध प्रांतात 10 जण ठार झाल्याची नोंद या अहवालात करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.