अहमदनगर। इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी डॉ. शितल घोगरे; सचिवपदी डॉ. वंदना बोरा
Updated On:

श्रीरामपूर – इनरव्हील क्लब श्रीरामपूर अध्यक्षपदी डॉ. शीतल घोगरे यांची तर सचिवपदी डॉ. वंदना बोरा यांची सन 2024 -25 साठी निवड करण्यात आली.
इनरविल क्लबच्या नूतन अध्यक्षा डॉक्टर शीतल घोगरे या वीस वर्षापासून शहरात वैद्यकीय सेवेचे काम करत आहे. त्यांनी क्लबच्या माध्यमातून प्रामुख्याने महिलांसाठी विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणाचे विविध उपक्रम राबविले आहेत.
सचिव डॉ. वंदना बोरा या सामाजिक कार्यात आघाडीवर असतात नूतन कार्यकारिणीमध्ये सुरेखा दंड, डॉ. सारिका घेरडे, सुवर्णा दळवी, रमा फोपळे, प्रिया अग्रवाल, सुनीता धुमाळ, डॉ. सिंधुताई पडघन, डॉ. अर्चना सोमानी, डॉ. उज्वला कवडे ,राखी बिहाणी, मंजुश्री मुरकुटे , भारती काळे, वंदना मुरकुटे, कांचन मुळे, डॉ. वैशाली कापसे, सुवर्ण आगे, गीताली सोनवणे, स्वाती ढालपे, रतन देशमुख, जयश्री जगताप यांचा समावेश करण्यात आला आहे.





