मुंबई – सारा अली खान ही त्या नवीन स्टार्सपैकी एक आहे जी मीडियाशी खूप मैत्रीपूर्ण संवाद ठेवते. तिच्या मूडची पर्वा न करता, ती नेहमीच स्माईल देऊन मीडियाला रिऍक्शन देते.नुकतीच सारा विमानतळावर स्पॉट झाली. सारा सोशल मीडियावर देखील अगदी सर्वसामान्यांप्रमाणे अनेकदा पोस्ट करताना दिसून येते.
सारा अनेकदा ग्राउंड टू अर्थ राहण्याचा प्रयत्न करते म्ह्णूनच साराचे फॉलोविंग दिवसेंदिवस वाढत चालले आहे. विमानतळ असो व चित्रपटाचा सेट सारा नेहमीच आपल्याला हव्या त्या कम्फर्टमधे वावरताना दिसते. चाहत्यांना देखील साराची हीच गोष्ट आवडते. नुकतंच साराने आपल्या सुरुवातीच्या काळातील लेक किस्सा सांगितला आहे.ज्यात ती लोक सुरुवातीच्या काळामध्ये तिच्याबाबत काय बोलायचे याबाबत भाष्य करते.
आता सर्वजण साराचे कौतुक करतात. पण एक वेळ अशीही आली जेव्हा तिची खिल्ली उडवली गेली. याबाबत ती सांगते, “मला शिस्त लागावी म्हणून अनेकांना वाटायचं की मी पुन्हा शाळेत जावं.‘इसको बैठना नहीं आता, बोलना नहीं आता, कुछ भी बोल देती है, झल्ली जैसी आ जाती है असं लोक सुरुवातीला म्हणायचे असा खुलासा साराने केला आहे.
सारा म्हणते की आता लोक फक्त तिला फॉलो करतात. “आता हा ट्रेंड झाला आहे. आता सगळे ओले केस घेऊन विमानतळावर जातात. पूर्वी सगळे मला केस सुकवल्याशिवाय विमानतळावर जाऊ नकोस असा सल्ला द्यायचे. पण आता मी ते करते तेव्हा बाकीचेही करतात. म्हणून ट्रेंड सेटर म्ह्णूनही माझ्याकडे पाहिले जाते आणि मला यात आनंद मिळतो असं सारा सांगते.