जाणून घ्या, करोना विषाणूबाबत माहिती व प्रतिबंधाची खबरदारी

साध्यासुध्या सर्दी, खोकल्यापासून ते “मर्स’ (चठडअ) किंवा “सार्स’ यासारख्या गंभीर आजारास कारणीभूत असणाऱ्या एका विशिष्ट प्रकारच्या विषाणू गटास “करोना विषाणू’ असे म्हणतात. 2003 साली आढळलेला सार्स हादेखील एक प्रकारचा करोना विषाणूच होता. सध्या चीनमधील उद्रेकात आढळलेला विषाणू हा करोना विषाणूच आहे. तथापि, त्याची जनुकीय रचना पूर्णपणे नवीन असल्याने त्यास “नॉव्हेल करोना व्हायरस’ असे नाव देण्यात आले आहे.

करोना विषाणूजन्य आजाराची सर्वसामान्य लक्षणे – सर्दी, खोकला (कॉमन कोल्ड), श्‍वसन संस्थेच्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी जसे, श्‍वास घ्यायला त्रास होणे, श्‍वासास अडथळा होते, त्याचबरोबर न्यूमोनिया, पचनसंस्थेची लक्षणे, अतिसार, काही रुग्णांमध्ये मूत्रपिंडे निकामी होणे, प्रतिकारशक्तीची कमतरता असलेल्या व्यक्तींमध्ये सामान्य (ढूळिलरश्र) लक्षणे आढळू शकतात.
रोगप्रसार – या विषाणूचा प्रसार नक्‍की कशा प्रकारे होतो, याची निश्‍चित माहिती आजघडीला उपलब्ध नाही. मात्र, लक्षणांचे स्वरूप पाहता शिंकणे, खोकणे या वाटे हवेमार्फत (ऊीेश्रिशीं) या विषाणूचा प्रसार होत असावा, असा अंदाज आहे. या विषाणूवर कोणतीही लस अथवा विशिष्ट औषध उपलब्ध नाही. करोना विषाणू हा प्राणीजन्य आजार असला तरी हा नवीन विषाणू नक्‍की कोणत्या प्राण्याच्या संपर्कातून पसरतो, याची निश्‍चित माहिती सध्या नाही.

उपचार – रुग्णाच्या लक्षणानुसार करावा. रुग्णाला साह्यभूत ठरणारी निगा (र्डिीींर्ळींश उरीश) अत्यंत प्रभावी ठरते. प्रतिबंधाची खबरदारी – या विषाणूचा उद्‌भव कसा झाला आणि त्याचा प्रसार कसा होतो, हे निश्‍चितपणे माहिती नसल्याने या संदर्भात निश्‍चित प्रतिबंधात्मक खबरदारी कशी घ्यावी, यावर भाष्य करणे कठीण आहे; परंतु सर्वसाधारणपणे आजाराचे स्वरूप लक्षात घेता, हा आजार होऊ नये म्हणून पुढीलप्रमाणे प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे आवश्‍यक आहे.

श्‍वसन संस्थेचा आजार असलेल्या व्यक्तींशी निकटचा सहवास टाळणे, हातांची नियमित स्वच्छता, न शिजवलेले अथवा अपुरे शिजवलेले मांस खाऊ नये, फळे, भाज्या न धुता खाऊ नये, खोकताना, शिंकताना नाकातोंडावर रुमाल ठेवणे/टिश्‍यू पेपरचा वापर करणे, अशा प्रकारे वापरलेले टिश्‍यू पेपर व्यवस्थित झाकण असलेल्या कचरापेटीत ताबडतोब टाकावेत.

पुढील व्यक्तींनी विनाविलंब वैद्यकीय सल्ला घ्यावा – श्‍वसनास त्रास होणाऱ्या व्यक्‍ती : हा त्रास कोणत्या आजारामुळे/विषाणूमुळे होत आहे, हे स्पष्ट होत नसल्यास आणि रुग्णाने नुकताच मध्यपूर्वेत प्रवास केला असल्यास, प्रतिकारशक्ती कमी असलेल्या आजारी व्यक्ती आणि ज्यांनी नुकताच नवीन करोना विषाणूबाधित देशात प्रवास केला आहे, त्यांनी, अशा रुग्णावर उपचार करणारे डॉक्‍टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना या आजाराचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे रुग्णावर उपचार करणारे डॉक्‍टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी सुयोग्य संसर्गप्रतिबंध व नियंत्रण पद्धती वापरणे आवश्‍यक आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.