Jammu and Kashmir: कृष्णा घाटी सेक्टर मधील घुसखोरीचा डाव उधळला
Updated On:

पूंछ (जम्मू आणि काश्मीर) : जम्मू आणि काश्मीरच्या कृष्णा घाटी सेक्टरमध्ये 23-24 जूनच्या मध्यरात्री भारतीय सैन्य आणि लष्कराच्या संयुक्त कारवाईत पाकिस्तानी हद्दीतून होणारा घुसखोरीचा डाव उधळण्यात आला.
पाकव्याप्त काश्मीरमधून भारताच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केला जात असताना मच्छल सेक्टरच्या काला जंगलात चार दहशतवादी ठार झाल्याच्या घटनेच्या दोन दिवसांनंतर ही घटना घडली आहे.
लष्कराच्या निवेदनात म्हटले आहे की, घुसखोर आणि लष्कर यांच्यात झालेल्या गोळीबारात एका सैनिकाला गोळी लागली.
गुप्तचर सूत्रांकडून ही घुसखोरीची माहिती मिळाल्यानंतर तेथे रेशम हे काउंटर ऑपरेशन सुरू करण्यात आले होते.
त्यावेळी काही घुसखोर पुन्हा पाक व्याप्त काश्मीरच्या दिशेने पळून गेले. त्यावेळी काही जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे.





