शिरूर -शिरूर तालुक्यात करोना बाधितांची वाढती संख्या सुरू असून, आज शिरूर तालुक्यातील 7 गावांत 11 करोना बाधित रुग्ण आढळले. तालुक्यात करोनाचा आकडा आता 333 एवढा झाला असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.
आज शहरात प्रीतम-प्रकाशनगर येथील 36 वर्षीय कंपनी कामगार पॉझिटिव आढळला आहे. शहरातून पाठवण्यात आलेल्या 60 जणांपैकी एकाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून 59 जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने शहरासह तालुक्याला आज मात्र थोडा दिलासा मिळाला आहे; तर शिरूर कोविड केअर सेंटर येथून शहरातील 12 जणांचे करोना तपासणीकरिता नमुने पाठवल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील यांनी दिली आहे.
बाधितांचा आकडा 333वर पोहचला असून शहरातील रुग्णसंख्या 62 यामध्ये 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील गावामध्ये एकूण रुग्णसंख्या 271 यापैकी 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज नव्याने सापडलेल्या रुग्णामध्ये शिरूर शहरात 1 व तालुक्यातील शिक्रापूर 3, कोरेगाव भीमा 2, मांडवगण 2, धानोरे 1, दरेकरवाडी 1, मलठण 1 असे सात गावात 11 करोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडले.