जुन्नर -जुन्नर तालुक्यातील सावरगांव, मांजरवाडी, धोलवड, आंबेगव्हाण व डिंगोरे या पाच गावांतील तेरा रुग्णांनी करोनावर मात केली आहे. ही गावे करोनामुक्त झाली असली तरी पुन्हा गावात करोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून प्रशासन सर्तक आहे.
करोनाच्या रुग्णांनी शुक्रवारी (दि.5) पंचविशी पार केली होती. एकूण 26 रुग्णसंख्या झाली होती. शनिवारीपर्यंत (दि.6) एकूण 13 रुग्ण बरे झाले आहेत.
लेण्याद्री कोविड सेंटरमधून सात तर पुणे येथून सहा रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. औरंगपूर येथील एकाचा करोनामुळे मृत्यू झाला होता. सध्या 12 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत.
गावनिहाय रुग्णसंख्या पुढील प्रमाणे-
डिंगोरे – 1 (बरा), औंरगपूर – 1 (मृत्यु), सावरगांव – 5 (बरे), धोलवड – 3 (बरे), आंबेगव्हाण – 2 (बरे), मांजरवाडी -2 (बरे), पारुंडे – 3, खिलारवाडी – 1, धालेवाडी तर्फे मिन्हेर -1, विठ्ठलवाडी-वडज – 1, शिरोलीतर्फे आळे – 2, ओतूर-2 कुरण-1, चिंचोली-1.