INDW vs AUSW 3rd T20 : निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियानं Toss जिंकला, कर्णधार एलिसानं घेतला ‘हा’ निर्णय…

India Vs Australia Women’s Cricket 3rd T20 Match Updates : आज भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमध्ये तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना खेळला जात आहे. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. सध्या मालिका 1-1 अशी बरोबरीत असून हा सामना जिंकणारा संघ टी-20 मालिकेवर कब्जा करेल. भारताने पहिला टी20 नऊ विकेट्सने तर ऑस्ट्रेलियाने दुसरा टी20 सहा गडी राखून जिंकला.
ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅलिसा हिलीने टाॅस जिंकला आहे. कर्णधार हिलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघ कोणताही बदल न करता मैदानात उतरले आहेत.
Australia have won the toss and elected to field
Follow the Match ▶️ https://t.co/nsPC3lefeg#TeamIndia | #INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Z7A0sO2uw3
— BCCI Women (@BCCIWomen) January 9, 2024
आज खेळला जाणारा तिसरा आणि निर्णायक टी-20 सामना भारताने जिंकला तर प्रथमच मायदेशात या फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकण्यात भारताला यश येईल. हरमनप्रीत कौरचा फॉर्म भारतासाठी चिंतेचा विषय आहे. भारतीय कर्णधाराला सर्व फॉरमॅटमध्ये गेल्या 10 सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावण्यात अपयश आले आहे. गेल्या 11 डावांत ती सात वेळा दुहेरी आकडा गाठण्यातही अपयशी ठरली आहे.
दुसऱ्या सामन्यात अष्टपैलू दीप्ती शर्माने बॉल आणि बॅट दोन्हीत चांगली कामगिरी केली, पण भारताला विजय मिळवून देण्यात ती अपयशी ठरली. तिने 27 चेंडूत 31 धावा करून भारताला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डावातील पहिले दोन विकेटही काढले, पण ते संघाला विजयासाठी पुरेसे नव्हते. आज होणाऱ्या तिसऱ्या सामन्यातही दिप्तीवर मोठी जबाबदारी असणार आहे.




