INDW vs AUSW 2nd ODI : वुमन्स टीम इंडिया आणि वुमन्स ऑस्ट्रेलियामध्ये दुसरा वन डे सामना सुरू आहे. यामध्ये ऑस्ट्रिलियने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलिया संघाने 50 ओव्हरमध्ये 258 रन्स पर्यंत मजल मारता आली.यादरम्यान दीप्ती शर्माने एक अनोखा कारनामा केला.
गेल्या काही मालिकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी दाखवणाऱ्या दीप्तीने या सामन्यातही आपला दमदार खेळ सुरु ठेवला. दिप्तीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 10 षटकात केवळ 38 धावा देत 5 विकेट घेतल्या. यासह दीप्ती ही ऑस्ट्रेलिया महिला संघाविरुद्ध अशी कामगिरी करणारी पहिली महिला आशियाई क्रिकेटपटू ठरली आहे.
दीप्तीने ४१ वर्षे जुना विक्रम मोडला
या सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर त्यांची सुरुवातही चांगली झाली आणि संघाने 117 धावांवर केवळ 1 गडी गमावला. इथून दीप्तीने आपल्या गोलंदाजीची जादू दाखवत अर्ध्या संघाला एकट्याने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया महिला संघाला 50 षटकांत 8 विकेट गमावून 258 धावांपर्यंतच मजल मारता आली.
दीप्तीपूर्वी, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेमध्ये भारतीय महिला खेळाडूचा सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम सँड्रा ब्रिगांझाच्या नावावर होता, जिने 1982 विश्वचषक स्पर्धेत इंटरनेशनल इलेवन महिला संघाकडून खेळताना 24 धावांत 4 बळी घेतले होते. आता दीप्तीने हा विक्रम मोडीत काढला आहे. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटबाबत बोलायचे तर दीप्ती एकमेव आहे जिने ऑस्ट्रेलिया महिला संघाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पाच विकेट्स घेतल्या आहेत यामुळे दीप्तीच्या नावे एक अनोखा रेकॉर्ड बनला आहे.
Deepti Sharma sizzled with a five-wicket haul in Mumbai as India restricted Australia to a modest total 🌟#INDvAUS 📝: https://t.co/VH58dmw7Ed pic.twitter.com/czvgYDAXeh
— ICC (@ICC) December 30, 2023
ऑस्ट्रेलियाविरुद्ध आशियाई महिला गोलंदाजांची सर्वोत्तम गोलंदाजी
दीप्ती शर्मा (भारत) – ३८ धावांत ५ बळी
सँड्रा ब्रिगांझा (भारत) – 24 धावांत 4 विकेट्स
नूशीन अल खादर (भारत) – 41 धावांत 4 बळी
रुमेली धर (भारत) – ५३ धावांत ४ बळी
झुलन गोस्वामी (भारत) – ६ धावांत ३ बळी
शशी गुप्ता (भारत) – १९ धावांत ३ बळी