#INDvENG 5th Test : चेतेश्वर पुजाराला अखेरची संधी

लंडन – भारताचा मधल्या फळीतील तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्वर पुजारा याला इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटीत आपली कारकीर्द वाचवण्याची अखेरची संधी मिळणार आहे. गेल्या दोन मोसमांपासून सातत्याने अपयशी ठरलेल्या पुजाराने रणजी करंडक तसेच त्यानंतर काउंटी क्रिकेटमध्ये सातत्याने सरस कामगिरी केली त्यामुळे त्याला भारताच्या कसोटी संघात स्थान देण्यात आल्याने ही त्याच्यासाठी अखेरची संधी ठरणार आहे. या सामन्यात पुजाराने मोठी खेळी केली तर आगामी काळात होत असलेल्या कसोटी मालिकांमध्यही त्याला संघातील स्थान कायम राखता येणार आहे.
दरम्यान, इंग्लंड व भारत यांच्यातील एकमेव कसोटी सामना येत्या 1 जुलैपासून सुरू होणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या कसोटी मालिकेचा हा एक भाग आहे. गेल्या वर्षी भारतीय संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला गेला होता, मात्र चार सामन्यांनंतर भारताचे काही खेळाडू आणि प्रशिक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. अशा स्थितीत भारतीय संघाने चार कसोटीनंतर पाचवी कसोटी पुढे ढकलली गेली होती.
या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ 2-1 असा आघाडीवर आहे. जागतिक कसोटी विजेतेपद स्पर्धेत या कसोटीचा समावेश असून जर भारतीय संघाने ही कसोटी जिंकली तर 2007 सालानंतर भारतीय संघाला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकेल.





