#INDvENG 4th T20 : इंग्लंडसमोर विजयासाठी 186 धावांचे आव्हान
Updated On:

अहमदाबाद – सूर्यकुमार यादवचे अर्धशतक आणि श्रेयस अय्यरच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 186 धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताने निर्धारित 20 षटकांमध्ये 8 विकेट्स गमावून 185 धावा केल्या.
भारताकडून सूर्यकुमार यादवने 31 चेंडूत सर्वाधिक 57 धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने फटकेबाजी करत 18 चेंडूत 37 धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त भारताकडून रिषभ पंतने 30(23), लोकेश राहूलने 14(17), रोहित शर्माने 12(12) आणि हार्दिक पंड्याने 11(08) धावांची खेळी केली. कर्णधार विराट कोहली केवळ 1 धाव काढून बाद झाला.
इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने 4 षटकांत 33 धावा देताना सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर आदिल राशिद, बेन स्टोक्स,मार्क वुड आणि सॅम करन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.





