इंद्रायणीच्या प्रदूषित पाण्याचा शेती पिकांवर परिणाम; परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त
Updated On:

चिंबळी – श्री क्षेत्र आळंदी ते देहू या तिर्थक्षेत्रांच्या पुण्यभूमीमधून वाहत असलेल्या इंद्रायणी नदीच्या पात्रात गेल्या पंधरा दिवसांपासून मोशी चिंबळी हद्दीतील केटी बधाऱ्याजवळ पांढरा शुभ्र फेस निर्माण झाला आहे.
या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून रब्बी हंगामातील कांदा, गव्हू, हरभरा, लसूण आदी पिकांवर यांचा परिणाम होऊन उत्पादनात घट होईल. परिसरातील शेतकरी वर्ग या मानवनिर्मित संकटामुळे चिंताग्रस्त झाला आहे.






