पिंपरी | इंदोरी ग्रामपंचायत कार्यालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

इंदोरी, (वार्ताहर) – इंदोरी ग्रामपंचायत कार्यालयाची सध्याची इमारत कमी पडू लागल्याने ३५०० चौरसफूट क्षेत्रफळाच्या नवीन इमारतीचे बांधकाम गतवर्षी सुरू झाले. सदर इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून, रंगकाम व फर्निचरचे काम सध्या सुरू आहे. लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता असल्याने उद्घाटन मुहूर्त लांबणीवर पडला असून या इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.
तळेगाव व चाकण एमआयडीसीमुळे इंदोरी गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने ग्रामपंचायत सदस्य संख्या १७ व सरपंचपद अशी १८ पर्यंत वाढ झाली आहे. तसेच ग्रामपंचायत प्रशासनाच्या कामाचाही व्याप वाढला आहे.
त्यामुळे सध्याची ग्रामपंचायत कार्यालय इमारत कमी पडू लागल्याने सुमारे ३५०० चौरसफूट क्षेत्रफळाच्या नवीन इमारतीचे बांधकाम गतवर्षी सुरू झाले. बांधकाम पूर्ण झाले असून, रंगकाम व फर्निचरचे काम सध्या सुरू आहे. लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता होती.
ती आता संपली असल्याने ही इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. तसेच शेजारील तलाठी कार्यालयाच्याही नवीन इमारतीचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. या दोन्ही इमारतींचे उद्घाटन एकावेळी करणे सोयीचे होईल. आचारसंहिता कालावधी संपण्याची वाट पाहत असून हे ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान योजना तसेच १५ वा वित्त आयोग आणि ग्रामपंचायत फंडातून करण्यात आले आहे.





