Indoor Plants: उन्हाळा सुरू झाला की घरातील तापमान वाढणं ही सामान्य समस्या आहे. कडक उन्हामुळे आणि उष्ण वाऱ्यामुळे घर गरम होतं, त्यामुळे अनेकजण एसी किंवा कूलरचा वापर करतात. मात्र, यामुळे वीजबिल वाढतं आणि आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. अशा वेळी काही नैसर्गिक उपाय खूप उपयोगी ठरतात. घरात ठेवलेली इनडोअर झाडं केवळ सौंदर्य वाढवत नाहीत, तर हवा शुद्ध करून वातावरण थंड ठेवण्यासही मदत करतात. उन्हाळ्यात घर थंड ठेवण्यासाठी काही खास झाडं खूप प्रभावी मानली जातात. यामध्ये सर्वात पहिलं नाव म्हणजे अॅलोवेरा. हे झाड त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असण्यासोबतच हवा शुद्ध करण्याचं काम करतं. अॅलोवेराला खूप कमी पाण्याची गरज असते आणि ते थेट सूर्यप्रकाशातही सहज वाढतं, त्यामुळे ते घरासाठी उत्तम पर्याय आहे. Indoor Plants aloe vera plant दुसरं महत्त्वाचं झाड म्हणजे स्नेक प्लांट. याला ‘मदर-इन-लॉ टंग’ असंही म्हटलं जातं. या झाडाची खासियत म्हणजे ते रात्रीही ऑक्सिजन सोडतं, त्यामुळे बेडरूमसाठी हे खूप योग्य आहे. हे झाड हवेतले विषारी घटक शोषून घेतं आणि वातावरण ताजं ठेवतं. Indoor Plants तिसरं झाड म्हणजे पीस लिली. हे दिसायला आकर्षक असून घरातील हानिकारक रसायनं दूर करण्यास मदत करतं. कमी प्रकाशातही हे झाड चांगलं वाढतं, त्यामुळे घरातील कोणत्याही कोपऱ्यात ठेवता येतं. हे वातावरण शांत आणि सुखद बनवतं. Indoor Plants स्नेक प्लांट चौथं झाड म्हणजे बॅम्बू पाम. उन्हाळ्यात हवा कोरडी होते, तेव्हा हे झाड हवेत आर्द्रता वाढवतं. यामुळे श्वास घेणं सोपं होतं आणि घरात थंडावा जाणवतो. मात्र, हे झाड ठेवताना त्याला थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवणं आवश्यक आहे. पाचवं झाड म्हणजे स्पायडर प्लांट. हे झाड खूप कमी देखभालीतही चांगलं वाढतं, त्यामुळे नवशिक्यांसाठी उत्तम आहे. हे हवेतले प्रदूषक घटक कमी करून घरातील वातावरण स्वच्छ आणि ताजंतवानं ठेवतं. Indoor Plants Spider Plant ही सर्व झाडं घरातील तापमान नैसर्गिकरित्या कमी करण्यास मदत करतात. त्याचबरोबर, ती घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात. त्यामुळे उन्हाळ्यात एसीवर अवलंबून राहण्याऐवजी अशा नैसर्गिक उपायांचा वापर करणं अधिक चांगलं ठरू शकतं.