Indonesian President Prabowo Subianto। इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतील भाषणाची सध्या जागतिक सीटवर जोरात चर्चा सुरु आहे. कारण त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात आणि शेवट संस्कृत अभिवादनाने केला. त्यांनी जागतिक नेत्यांचे स्वागत “ओम स्वस्तियस्तु” या संस्कृत मंत्राने केले, जो त्यांच्या देशातील हिंदू-बहुल बाली बेटावर वापरला जातो. या मंत्राचा अर्थ “तुम्हाला आशीर्वाद आणि सुरक्षितता लाभो.”असा होतो. प्रबोवो सुबियांतो यांनी त्यांच्या भाषणाचा शेवट “ओम शांती, शांती, शांती ओम” या शब्दांनी केला, तसेच इतर धर्मांचे मंत्र देखील म्हटले. त्यांनी सांगितले की सर्व धर्म – यहूदी, मुस्लिम, ख्रिश्चन, हिंदू आणि बौद्ध – यांनी एकाच मानवी कुटुंबासारखे जगले पाहिजे. इंडोनेशिया हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी वचनबद्ध आहे. संयुक्त राष्ट्रांचे रक्षण Indonesian President Prabowo Subianto। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांवर केलेल्या हल्ल्यांना सुबियांतो यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्र इंडोनेशियाच्या स्वातंत्र्याच्या लढाईत आणि रोग, भूक आणि गरिबी निर्मूलनाच्या लढाईत महत्त्वपूर्ण मदत करत आहे. त्यांनी सांगितले की त्याठिकाणी घेतलेल्या निर्णयांमुळे इंडोनेशियाला आंतरराष्ट्रीय वैधता मिळाली.” असे म्हणत संयुक्त राष्टच्या कामाचे कौतूक आणि आभार मानले. पुढे राष्ट्रपती प्रबोवो सुबिआंतो यांनी म्हटलं की, जागतिक शांतता, न्याय आणि समान संधी सगळ्यांना मिळायला हवी. भीती, वंशवाद, द्वेष, दडपशाही आणि रंगभेदामुळे प्रेरित मानवी मूर्खपणा आपल्या सामायिक भविष्याला धोका निर्माण करतो. गाझा येथे शांतता प्रस्थापित होण्यासाठी इंडोनेशियाची त्यांचे २० हजार सैन्य तिथे तैनात करण्याची तयारी आहे. आज इंडोनेशिया हा संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सैन्यात सर्वात मोठा योगदान देणारा देश आहे. जिथे शांततेला संरक्षणाची गरज आहे तिथे आम्ही सेवा देत राहू, फक्त शब्दांनी नाही तर जमिनीवर असलेल्या सैनिकांसह असं त्यांनी सांगितले. ट्रम्प यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा Indonesian President Prabowo Subianto। सुबियांतो यांनी नाव न घेता अमेरिका किंवा ट्रम्प यांची टीका केली आणि विविध देश आणि संस्थांना दिलेल्या धमक्यांवर टीका केली. ते म्हणाले की कोणताही एक देश संपूर्ण मानवी कुटुंबाला धोका देऊ शकत नाही. दरम्यान, प्रबोवो यांनी आपल्या भाषण शेवट मात्र भावनिकरित्या केला. त्यांनी विविध धर्मांच्या अभिवादनांचा समावेश करून “वस्सलामु अलैकुम वरह्मतुल्लाही वबरकातुह, शालोम, ओम शांती, शांती ओम, नमो बुद्धाय. धन्यवाद…असं म्हणत प्रबोवो यांनी मुस्लिम, ज्यू, हिंदू आणि बौद्ध धर्मांचे प्रतिनिधित्व करत होते, त्यांच्यासमोर बहुधार्मिक सद्भावनेचा संदेश दिला.