Indigo Airline | तांत्रिक बिघाड, कर्मचाऱ्यांची कमतरता आणि नवीन FDT (Flight Duty Time) नियमांमुळे देशभरात शेकडो इंडिगो विमाने रद्द होत आहेत किंवा उशिराने धावत आहेत. प्रवाशांना होणाऱ्या त्रासामुळे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पीटर एल्बर्स यांनी जाहीरपणे माफी मागितली आहे. त्यांनी १० ते १५ डिसेंबरपर्यंत विमानांची सेवा पूर्णपणे सामान्य होईल, अशी आशा व्यक्त केली आहे. मात्र प्रवाशांना होणाऱ्या नाहक त्रासामुळे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी, नोव्हेंबरमध्ये नवीन फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (एफडीटीएल) नियम लागू केले असले तरी, इतर सर्व विमान कंपन्यांना कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागला नाही. यावरून हे स्पष्ट होते की, संपूर्णपणे दोष इंडिगोचा आहे. आम्ही संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहोत. पण इंडिगोवर कारवाई होणार हे नक्की, असा थेट इशारा दिला आहे. प्रवाशांना परिस्थिती कधी सुधारण्याची अपेक्षा करता येईल असे विचारले असता, नायडू म्हणाले, “मी असे म्हणू शकतो की कंपनी ही समस्या सोडवण्याच्या मार्गावर आहे. सर्व मेट्रो विमानतळांवर (दिल्ली, मुंबई, चेन्नई) गेल्या दोन दिवसांपासूनचा सर्व प्रवाशांच्या अडचणी दूर केल्या जात आहेत. इतर विमानतळांवरही आज रात्रीपर्यंत प्रवासी गर्दी कमी होईल. इंडिगो उद्यापासून मर्यादित क्षमतेने पुन्हा काम सुरू करेल.” इंडिगोची ऑपरेशन्स १०० टक्के क्षमतेने परत येण्यासाठी आणखी काही दिवस लागतील राम मोहन नायडू म्हणाले की, इंडिगोने आश्वासन दिले आहे की, ऑपरेशन्स सुरळीत झाल्यावर ते क्षमता वाढवतील. परंतु प्रवाशांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी उद्यापासून हे घडेल. इंडिगोची ऑपरेशन्स १०० टक्के क्षमतेने परत येण्यासाठी कदाचित आणखी काही दिवस लागतील. वैमानिक आणि केबिन क्रूसाठी पुरेशी विश्रांती सुनिश्चित करण्यासाठी डिझाइन केलेले नवीन एफडीटीएल नियम १ नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत आणि मंत्रालय आणि नियामक एअरलाइन्सशी सतत संपर्कात आहेत. युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीने गेल्या आठवड्यात एअरबस ए320 साठी अपडेट अनिवार्य केले आणि ते कोणत्याही व्यत्ययाशिवाय अल्पावधीत 323 विमानांसाठी पूर्ण झाले आहे. हेही वाचा: पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा; क्रिकेटपटूंसाठी सुवर्णसंधी