इंडिगो पेंट्सचा आयपीओ 20 जानेवारीपासून उपलब्ध

मुंबई – पुणे येथील इंडिगो पेंट्सचा आयपीओ (प्राथमीक समभाग विक्री प्रस्ताव) 20 जानेवारी रोजी खुला होऊन 22 जानेवारी रोजी बंद होणार आहे. या आयपीओतील शेअरची किंमत प्रती इक्विटी शेअर रु. 1,488 ते 1,490 दरम्यान निश्चित करण्यात आला आहे.
आयपीओमध्ये कंपनीकडून रु. 3,000 दशलक्ष इक्विटी शेअर्सचा ताजा इश्यू (फ्रेश इश्यू) समाविष्ट असेल. ऑफर फॉर सेलिंग प्रस्तावात कंपनीच्या पात्र कर्मचाऱ्यांकडून 70,000 इक्विटी शेअरचे आरक्षण समाविष्ट आहे. पात्र कर्मचाऱ्यांना प्रती शेअर रु. 148 ची सूट मिळणार आहे. क्यूआयबी वर्गाच्या 5% भाग केवळ म्युच्यूअल फंडांसाठी उपलब्ध करुन दिला जाईल. निव्वळ क्यूआयबी भाग प्रमाणबध्द आधारावर वाटप करण्यासाठी उपलब्ध असेल.
या व्यवहारातून जमा झालेल्या रकमेचा विनियोग कंपनीद्वारे तामिळनाडू येथील पुदुक्कोट्टाई येथील निर्मिती सुविधा केंद्राच्या जवळच्या भागात अतिरिक्त निर्मिती सुविधा केंद्र उभारणीकरिता करण्यात येईल. मशीन खरेदी, कर्जांची परतफेडीसाडीही रक्कम वापरण्यात येणार आहे.
या ऑफर अंतर्गत देऊ करण्यात येणारे इक्विटी शेअर हे बीएसईवर सूचीबद्ध होण्यासाठी प्रस्तावित आहे. लिस्टिंगनंतर एनएसईवर सूचीबद्ध होण्याकरिता प्रस्तावित आहेत. संध्या कंपनीची राजस्थान, केरळ, तामीळनाडू उत्पादन केंद्र आहेत.





