Indigo Flight Heavy Air Turbulence । विमान प्रवासात टर्ब्युलन्स येणं ही एक साधारण गोष्ट आहे. पण कधीकधी हे टर्ब्युलन्समुळे आपला जीव मुठीत येऊ शकतो हे देखील तेवढंच खरं आहे. अशीच काहीशी घटना इंडिगोच्या जोधपूर ते जयपूरच्या फ्लाइटमध्ये पाहायला मिळाली. या फ्लाईटमधील प्रवाशांनी हेव्ही टर्ब्युलन्सचा अनुभव घेतला. हा अनुभव इतका भयावह होता की, फ्लाइटमधील सर्वच प्रवासी ढसाढसा रडत होते. सर्वांची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. ही घटना इंडिगोच्या जोधपूर ते जयपूर फ्लाइट 6E-7406 शी संबंधित आहे. विमानात गोंधळ झाल्यानं प्रवासी घाबरले Indigo Flight Heavy Air Turbulence । प्राप्त माहितीनुसार, खराब हवामानामुळे इंडिगोच्या जोधपूर ते जयपूर फ्लाइट 6E-7406 फ्लाइटचं लँडिंग करण्याच मोठी अडचण आली. अशा परिस्थितीत विमान तब्बल 30 मिनिटांसाठी आभाळात घिरट्या घालत होतं. तर विमानात बसलेले प्रवासी चांगलेच घाबरल्याचं पाहायला मिळालं. विमानात गोंधळ झाल्यानं प्रवासी घाबरले. खराब हवामानामुळे काही प्रवासी रडायला लागले. फ्लाइटमध्ये उपस्थित असलेल्या प्रवाशांनी दावा केला की, त्यांनी विमानात असा गोंधळ यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. ऑक्सिजन बॅग्सही उघडल्या Indigo Flight Heavy Air Turbulence । इंडिगोच्या फ्लाइटमधील प्रवाशांनी हादरवणाऱ्या टर्ब्युलन्सचा अनुभव घेतला. एवढ्या हेव्ही टर्ब्युलन्समुळे फ्लाइटमधील ऑक्सिजनच्या बॅग्सही उघडल्या. तब्बल 30 मिनिटांसाठी विमान आकाशात घिरट्या घालत होतं. अखेर पायलट्सनी विमान सुखरुप जयपूर विमानतळावर उतरवले. विमान धावपट्टीवर स्थिरावलं आणि सर्व प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. इंडिगो फ्लाइट 6E-7406 जोधपूरहून सकाळी 11:05 वाजता उड्डाण करणार होती आणि 1 तास 15 मिनिटांनी 12:20 वाजता जयपूरला पोहोचणार होती. पण, खराब हवामानामुळे विमानानं जोधपूरहून दुपारी 12.02 मिनिटांनी उड्डाण घेतलं. तर दुपारी 1:42 वाजता विमान जयपूर विमानतळावर उतरलं. यावेळी विमान जयपूरमध्ये तब्बल 25 मिनिटं आकाशात घिरट्या घालत होतं. हेही वाचा मक्कामध्ये सूर्याचा प्रकोप ! 1000 हून अधिक यात्रेकरूंचा उष्माघाताने मृत्यू