India’s unemployment rate: भारताचा बेरोजगारी दर 4.8 टक्क्यांवर; शहरी भागात सर्वाधिक फटका

नवी दिल्ली – डिसेंबर महिन्यातील भारतातील बेरोजगारीचा दर वाढून 4.8% इतका झाला आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये बेरोजगारीचा दर 4.7% इतका होता. पंधरा वर्षाखालील व्यक्तीसंदर्भातील माहिती घेऊन हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
केंद्रीय सांख्यिकी विभागाने जारी केलेल्या या अहवालातील माहितीनुसार ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर 3.9% आहे. तर शहरी भागातील बेरोजगारीचा दर 6.7% इतका आहे. राष्ट्रीय पातळीवर पुरुषातील बेरोजगारीचा दर 4.1% आहे, तर महिलांच्या बेरोजगारीचा दर 9.1 टक्के इतका असल्याचे सांगण्यात आले. हा बेरोजगारीचा दर चिंताजनक नाही.
अनेक महिन्यापासून बेरोजगारीचा दर सध्याच्या आकडेवारीवर स्थिर आहे असे सांगण्यात आले. निर्यात घसरल्यामुळे निर्यात करणार्या कंपन्यांमध्ये काही प्रमाणात बेरोजगारी वाढली असल्याच्या बाबीवर या अहवालात कसलेही भाष्य करण्यात आलेले नाही. जीएसटी कपातीनंतर देशातील कंपन्यांची उत्पादकता वाढत आहे. त्यामुळे शहरातील बेरोजगारीचा दर कमी होण्यास मदत मिळत आहे असे सांगण्यात आले.





