ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे शेअर बाजारात घसरण, पण ‘या’ क्षेत्रात प्रचंड तेजी; शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची गर्दी

Donald Trump Tariff Announcement | डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा फटका आज शेअर बाजाराला बसल्याचे पाहायला मिळाले. टॅरिफ धोरणामुळे बाजारात घसरण दिसून आली, तरीही वस्त्रोद्योग क्षेत्रातील कंपनी पेज इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. कंपनीचे शेअर्स आज दिवसाच्या व्यवहारात 1.4 टक्क्यांनी म्हणजेच 608 रुपयांनी वधारून 43,625 रुपयांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले. होते.
अमेरिकेने भारतीय वस्तूंवर 26 टक्के ‘डिस्काउंटेड रेसिप्रोकल टॅरिफ’ लावल्यानंतर शेअर्समध्ये ही वाढ दिसून आली.पे ज इंडस्ट्रीजसोबतच इतर वस्त्रोद्योग कंपन्यांच्या शेअर्समध्येही वाढ झाली.
वेलस्पन लिविंगच्या शेअर्समध्ये 5.57 टक्के, वर्धमान टेक्सटाइल्समध्ये 16.4 टक्के, अरविंद लिमिटेडमध्ये 3.3 टक्के, के.पी.आर. मिल लिमिटेडमध्ये 6.4 टक्के, सियाराम सिल्क मिल्समध्ये 3.8 टक्के, बॉम्बे डाइंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये 3.1 टक्के, पेज इंडस्ट्रीजमध्ये 0.63 टक्के आणि गोकलदास एक्सपोर्ट्समध्ये 6.14 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.
वस्त्रोद्योग कंपन्यांना कसा होणार फायदा?
तज्ञांच्या मते अमेरिकेचे राट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्रात स्पर्धात्मक पाहायला मिळू शकते. कारण व्हिएतनाम, बांगलादेश आणि चीनसारख्या प्रतिस्पर्धकांना उच्च टॅरिफचा सामना करावा लागू शकतो.
भारत इतर आशियाई देशांच्या तुलनेत अमेरिकेला अधिक निर्यात करू शकेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याचे कारण इतर देशांवर अधिक टॅरिफ लागलेले आहे.
किती मोठा आहे वस्त्रोद्योग?
वस्त्रोद्योग बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे, जो त्यांच्या एकूण निर्याताच्या 80% आणि जीडीपीमध्ये 15% योगदान देते. बांगलादेशकडून युरोपियन युनियन, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशांना सर्वाधिक कापड निर्यात केले जाते. मात्र, ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे बांगलादेशला फटका बसू शकतो. भारतीय वस्त्रोद्योग कंपन्यांसाठी अमेरिकेचे टॅरिफ धोरण फायदेशीर ठरू शकते, असे तज्ञांचे मत आहे.





