भारताचे मेनन बनले आयसीसी पॅनल पंच
Updated On:

दुबई – भारताचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच नितीन मेनन यांची आयसीसीच्या एलिट पॅनल पंचपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पॅनलवर नियुक्त होणारे मेनन भारताचे सर्वात युवा पंच आहेत.
इंग्लंडच्या नायजेल लॉंग यांच्या जागी मेनन आंतरराष्ट्रीय सामन्यात पंच म्हणून काम करतील. मेनन यांनी आतापर्यंत 3 कसोटी, 24 एकदिवसीय सामने व 16 टी-20 सामन्यांत पंच म्हणून काम केले आहे. माजी कर्णधार श्रीनिवास वेंकटराघवन व सुंदरम रवी यांच्यानंतर आता मेनन यांना हा मान मिळाला आहे.





