भारताच्या जास्मिन लंबोरियाने रचला इतिहास; बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण

Jasmine Lamboriya Won Gold | भारताच्या जास्मिन लांबोरिया हिने २०२५ च्या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. तिने अंतिम सामन्यात पोलंडच्या जूलिया स्जेरेमेटाला पराभूत केले. जिने 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावले होते.
दरम्यान, हा सामना खूपच चुरशीचा ठरला. पहिल्या फेरीत जास्मिन थोडी संघर्ष करताना दिसली. मात्र, दुसऱ्या फेरीत तिने जबरदस्त पुनरागमन केले आणि सामना जिंकला. जास्मिनने ज्युलिया सेमेटाचा ४-१ अशा फरकाने पराभव केला.
भारतीय पुरुष खेळाडूला पदक नाही
विशेष म्हणजे, 2025 च्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कोणत्याही भारतीय पुरुष खेळाडूला पदक मिळाले नाही. गेल्या 12 वर्षांत प्रथमच भारतीय पुरुष बॉक्सर पदकाविना परतले. जदुमणि सिंगला कझाकस्तानच्या सांजेर ताशकेनबेने 4-0 अशा फरकाने पराभूत केले. जदुमणि सिंगच्या पराभवामुळे भारतीय पुरुष संघाच्या पदरी निराशा पडली.
Jasmine Lamboriya clinches Gold at the World Boxing Championship in Liverpool.
Source: Boxinf Federation Of India pic.twitter.com/6o2grqakuz
— ANI (@ANI) September 14, 2025
जास्मिन लांबोरियाची प्रतिक्रिया
“विश्वविजेतेपद मिळवणे माझ्यासाठी खूप मोठे आहे. पॅरिस ऑलिंपिकमध्ये लवकर बाहेर पडल्यावर मी माझ्या खेळात शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप सुधारणा केली. या सुवर्णपदकामागे गेल्या वर्षभरातील कठोर मेहनत आहे,” असे म्हणत जास्मिनने आनंद व्यक्त केला. Jasmine Lamboriya Won Gold |
जास्मिन लंबोरिया कोण आहे?
जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी जास्मिन लंबोरिया 24 वर्षांची आहे. तिचा जन्म 30 ऑगस्ट 2001 रोजी हरियाणाच्या भिवानी येथे झाला. जास्मिन एका बॉक्सिंग कुटुंबातून आहे. तिचे आजोबा कॅप्टन चंदर भान हे कुस्तीपटू होते. जास्मिनला तिचे काका संदीप सिंग आणि परविंदर सिंग यांनी प्रशिक्षण दिले, जे स्वतः राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियन होते. Jasmine Lamboriya Won Gold |
जास्मिन लंबोरियाने याच वर्षी वर्ल्ड बॉक्सिंग कपमध्येही सुवर्णपदक जिंकले होते. याशिवाय, तिने 2022 च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल खेळांमध्ये आणि 2021 च्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक मिळवले आहे.
हेही वाचा :
राज्यात पुन्हा कोसळधारा ! पुढील ४८ तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता,





