India’s GST collection : फेब्रुवारी महिन्यात किती झालं GST संकलन? अर्थ मंत्रालयाने जाहीर केली आकडेवारी….

GST collection in February 2024 | फेब्रुवारी महिन्यात जीएसटी संकलनात 12.5% वाढ झाली. या महिन्यांमध्ये 1.68 लाख कोटी रुपये केंद्र सरकारला जीएसटीच्या माध्यमातून उपलब्ध झाल्याची आकडेवारी अर्थ मंत्रालयाने जाहीर केली आहे. एप्रिल ते फेब्रुवारी या कालावधीत झालेले जीएसटी संकलन 11.7 टक्क्यांनी वाढून 18.40 लाख कोटी रुपये झाले आहे.
गेल्या वर्षी प्रत्येक महिन्याला सर्वसाधारणपणे 1.5 लाख कोटी रुपये जीएसटी संकलन झाले होते. यावर्षी हे प्रमाण वाढून महिन्याला 1.67 लाख कोटी रुपये इतके झाले आहे. जीएसटी संकलनाच्या आकडेवारीचे वर्गीकरण केले असता देशांतर्गत वस्तूच्या विक्रीतून 13.9% इतका महसूल वाढला आहे. तर आया तिच्या माध्यमातून 8.5% इतका महसूल वाढला असल्याचे दिसून येते.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/share-market-stock-indices-hit-new-highs/
आता जीएसटी प्रणाली पूर्णपणे रुळली आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये या संकलनात आणखी भरीव वाढ होण्याची शक्यता अप्रत्यक्ष कर विभागाच्या अधिकार्यांनी व्यक्त केली. दरम्यान अजूनही काही प्रमाणात कर चूकवेगीरी होत आहे आणि ही कर चूकवेगीरी कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.


