देशातील पहिल्या काचेच्या पुलावर वाहतूक सुरु; मुख्यमंत्री म्हणाले, ‘समुद्रावर चालल्याचा भास होतोय’

कन्याकुमारी – तामिळनाडूच्या कन्याकुमारी किनाऱ्यावर बांधण्यात आलेल्या देशातील पहिल्या सागरी काचेच्या पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे. 77 मीटर लांब आणि 10 मीटर रुंद असलेल्या या पुलाचे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पुलाच्या बांधकामामुळे पर्यटकांना कन्याकुमारीच्या काठावरील विवेकानंद रॉक मेमोरियलपासून थेट तिरुवल्लुवर पुतळ्यापर्यंत पोहोचता येईल.
அய்யன் வள்ளுவர் சிலையை விவேகானந்தர் பாறையுடன் இணைக்கக் கடல் நடுவே அமைக்கப்பட்டுள்ள கண்ணாடி இழைப் பாலம் திறப்பு,
பல்வேறு வகைகளிலும் குறள்நெறி பரப்பும் தகைமையாளர்களுக்குச் சிறப்பு,
அறிவார்ந்தோரின் கருத்துச் செறிவுமிக்க பேச்சில் வள்ளுவத்தின் பயன் குறித்த பட்டிமன்றம் – என “வள்ளுவம்… pic.twitter.com/EmATLQhPLh
— M.K.Stalin (@mkstalin) December 30, 2024
हा पूल बांधण्यापूर्वी लोकांना विवेकानंद स्मारक आणि तिरुवल्लुवर पुतळ्यापर्यंत जाण्यासाठी बोटीचा आधार घ्यावा लागत होता. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने सुमारे 37 कोटी रुपये खर्च केले आहेत. उद्घाटनावेळी सीएम स्टॅलिन आणि इतर मंत्री पुलावरून फिरले. कन्याकुमारीच्या पर्यटन अधिकाऱ्याने सांगितले की, काचेच्या पुलावरून चालताना आपण समुद्रावर चालत असल्याचा भास होतो.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समुद्रावर बांधलेल्या कमानदार काचेच्या पुलाची रचना प्रगत पद्धतीने करण्यात आली आहे. हा पूल जोरदार समुद्राचे वारे आणि इतर धोकादायक समुद्र परिस्थितीचा सामना करण्यास सक्षम आहे. या सर्व गोष्टींसोबतच या पुलावरील लोकांच्या सुरक्षेसाठीही विशेष काळजी घेण्यात आली आहे.




