भारतातील २८४ अब्जाधीशांकडे ३३% राष्ट्रीय संपत्ती; नवे १३ श्रीमंत उदयाला!
Updated On:

नवी दिल्ली – भारतात सध्या २८४ अब्जाधीश असून त्यांच्याकडे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३३% म्हणजेच ९८ लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी ८.६ लाख कोटींसह अव्वल स्थानी आहेत, पण त्यांची संपत्ती गेल्या वर्षी १३% ने घटली. दुसरीकडे, गौतम अदानी यांची संपत्ती एक लाख कोटींनी वाढून ८.४ लाख कोटी रुपये झाली. या वर्षात १३ नवे अब्जाधीश उदयाला आले, तर १७५ अब्जाधीशांची संपत्ती वाढली आणि १०९ जणांची घटली.
भारतातील अब्जाधीशांचे दरडोई उत्पन्न ३४,५१४ कोटी रुपये असून, ते चीनच्या २९,०२९ कोटींपेक्षा जास्त आहे. यादीतील सर्वात श्रीमंत महिला रोशनी नादर यांच्याकडे ३.५ लाख कोटी रुपये असून, त्या जागतिक श्रीमंत महिलांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहेत. या आकडेवारीतून भारतातील संपत्तीचे असमान वितरण आणि श्रीमंतांचे वाढते वर्चस्व दिसून येते.





