WBBL 2021 | हरमनप्रीत व जेमिमाची वादळी खेळी
Updated On:

मेलबर्न – ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिलांच्या बिग बॅश क्रिकेट लीग स्पर्धेत भारताच्या महिला संघातील कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्ज या दोघींनी वादळी फलंदाजी केली. मेलबर्न रेनेगेड्स संघाला 4 गडी गमावून 207 धावांपर्यंत मजल मारून दिली.
हरमनप्रीतने अवघ्या 32 चेंडूंत 4 चौकार आणि 6 षटकारांसह 65 धावा फटकावल्या. तर, जेमिमाने 31 चेंडूत 10 चौकारांसह 52 धावांची खेळी केली.
यानंतर हरमनप्रीतने 19 धावांत एक गडी बाद केला. त्यांच्या कामगिरीसमोर ब्रिस्बेन हीट संघाचा डाव 192 धावांवर संपला. मेलबर्न रेनेगेड्स संघाने ब्रिस्बेन हीट संघाचा 15 धावांनी पराभव केला.





