Indian Women Team T20 World Cup 2026 : आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ या महाकुंभाला पुढील महिन्यापासून सुरुवात होत आहे. या अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाने कंबर कसली असून संघ मुंबईहून इंग्लंडसाठी रवाना झाला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आधी यजमान इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे आणि त्यानंतर विश्वचषक जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. Indian Women Team मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय खेळाडूंना इंग्लंडसाठी उड्डाण करताना स्पॉट करण्यात आले, जिथे सर्व खेळाडू आगामी आव्हानासाठी प्रचंड उत्सुक दिसले. यंदाचा महिला टी-२० विश्वचषक इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या (ECB) यजमानपदाखाली १२ जूनपासून सुरू होणार आहे. विश्वचषकापूर्वी भारत-इंग्लंड टी-२० मालिकेचा थरार – (Indian Women Team) बीसीसीआयने २ मे रोजीच विश्वचषकासाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली होती. या मेगा टूर्नामेंटपूर्वी भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. ही मालिका २८ मे ते २ जून दरम्यान खेळवली जाईल. विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी गेमचेंजर ठरणार आहे, कारण यामुळे खेळाडूंना तेथील परिस्थितीशी जुळवून घेता येईल. The beginning of yet another special journey! 🔥🧿 Cheered by fans and well-wishers, #TeamIndia depart from Mumbai for the ICC Women’s #T20WorldCup! 👏 ICC Women’s #T20WorldCup 👉 Starts 12th June pic.twitter.com/by0PqjMnmg — Star Sports (@StarSportsIndia) May 23, 2026 सराव सामन्यात वेस्ट इंडिज आणि इंग्लंडशी लढत (Indian Women Team) टी-२० विश्वचषकाचे मुख्य सामने सुरू होण्यापूर्वी ६ जूनपासून सराव (वॉर्म-अप) सामने खेळवले जातील. भारताचा पहिला सराव सामना वेस्ट इंडिजविरुद्ध कार्डिफच्या सोफिया गार्डन्स मैदानावर होईल. तर दुसऱ्या सराव सामन्यात भारतीय महिला संघ पुन्हा यजमान इंग्लंडशी दोन हात करेल. हेही वाचा – Kavya Maran Video : “हा फेकतोय का?”; क्रृणाल पंड्याच्या ‘त्या’ बॉलवर भडकली काव्या मारन; स्टँड्समधील रिअॅक्शनचा VIDEO व्हायरल ग्रुप-बी मध्ये काँटे की टक्कर; १४ जूनला पाकिस्तानशी महामुकाबला! यंदाच्या विश्वचषकात भारताचा रस्ता सोपा नसेल. टीम इंडियाला ‘ग्रुप-बी’ मध्ये ठेवण्यात आले असून, त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांसारखे तगडे संघ आहेत. भारतीय संघ आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात १४ जून रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध करणार आहे. भारताचे ग्रुप स्टेजचे वेळापत्रक: (Indian Women Team) १४ जून: भारत विरुद्ध पाकिस्तान १७ जून: भारत विरुद्ध नेदरलँड्स २१ जून: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २५ जून: भारत विरुद्ध बांगलादेश २८ जून: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (लॉर्ड्स मैदान) हेही वाचा – Kohli Head Controversy : हायव्होल्टेज सामन्यानंतर विराट कोहलीने ट्रॅव्हिस हेडशी हात मिळवणं का टाळलं? नेमक काय घडलं होतं? पाहा VIDEO टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ (Squad): हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, श्री चरणी, श्रेयंका पाटील, भारती फुलमाळी, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नंदनी शर्मा आणि राधा यादव.