आयसीएसई बोर्डाचा ‘दहावी’ व ‘बारावी’चा निकाल जाहीर

नवी दिल्ली – आयसीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल आज जाहीर झाला आहे. यंदा आयसीएसई दहावी परीक्षेचा निकाल 98.54 टक्के तर बारावाी परिक्षेचा निकाल 96.52% लागला आहे. निकालात मागील वर्षीच्या तुलनेत 0.03 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आयसीएसई 2019 ( Indian certificate of secondary education) परीक्षेत मुंबईच्या जमनाबाई नर्सी शाळेची जुही कजारिया 99.60% गुण मिळवून देशात पहिली आली आहे. तर मुंबईचे फोरम संजनवाला आणि अनुश्री चौधरी, अनुष्का अग्निहोत्री आणि ठाण्याचा यश भन्साळी 99.40% गुण मिळवून देशात दुसऱ्या क्रमांकावर येण्याचा मान मिळवला आहे.

बारावीच्या परिक्षेत देवांग कुमार अग्रवाल आणि विभा स्वामीनाथन यांनी अव्वल स्थान पटाकवले आहे. विद्यार्थ्यांना www.cisce.org या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.