मोदींच्या वयापेक्षा डॉलर 6 वर्षे पुढे निघाला, काँग्रेस नेते बीव्ही श्रीनिवास यांचा टोला

नवी दिल्ली – सोमवारी भारतीय रुपयाने अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 77.42 ही नीचांकी पातळी गाठली. इंटरबँक फॉरेन एक्स्चेंजमध्ये भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 77.17 वर उघडला आणि नंतर 77.42 वर परत आला. रुपयाच्या घसरणीमुळे आता विरोधी पक्ष मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत. काँग्रेस नेते बीव्ही श्रीनिवास यांनी ट्विटद्वारे पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.
त्यांनी लिहिले की, “डॉलर मोदीजींच्या वयापेक्षा 6 वर्षे पुढे निघाला, 2014 च्या तुलनेत रुपया जवळपास 20 रुपयांनी कमजोर झाला. 2014 मध्ये, मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी, 1 डॉलरची किंमत 58.57 रुपये होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वय बघितले तर त्यांचे वय 71 वर्षे आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस नेत्याने भारतीय रुपयाच्या घसरणीवर खिल्ली उडवली असून रुपया पंतप्रधानांच्या वयाच्या 6 वर्ष पुढे गेला असल्याचे म्हंटले आहे.
Dollar $ निकला मोदी जी की उम्र से 6 वर्ष आगे, रुपया हुआ 2014 के मुकाबले करीब 20₹ कमजोर,
2014 में मनमोहन सिंह जी के कार्यकाल के आखिरी दिन 1$ की कीमत ₹58.57 थी । pic.twitter.com/Ems3Hx96H8
— Srinivas BV (@srinivasiyc) May 9, 2022
याशिवाय काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, भारताच्या इतिहासात आज रुपया आयसीयूमध्ये. खिल्ली उडवत त्यांनी लिहिले, “आज रुपयाने मार्गदर्शक मंडळाचे वय ओलांडले आहे. देशात बेरोजगारी सर्वाधिक आहे, महागाईने कंबरडे मोडले आहे, सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल आहे, मोदी है तो मुमकिन है, असे ट्विट करत त्यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे.
काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर लिहिले आहे की, “रुपया आयसीयूमध्ये आहे, तेलाच्या किमती गगनाला भिडल्या असून शेअर बाजारात घसरण सुरु आहे, हे सर्व मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे घडले आहे, ज्यामुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे.”
रुपया कमकुवत झाल्यामुळे सर्वात मोठा परिणाम भांडवली वस्तू तसेच इलेक्ट्रॉनिक क्षेत्रावर होईल. कारण रुपया कमजोर झाला तर महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात होऊ शकते. रुपयाच्या कमजोरीचा नकारात्मक परिणाम रत्ने आणि दागिन्यांच्या क्षेत्रावर दिसून येईल. त्यामुळे ते महाग होईल आणि आयातीवरही परिणाम होईल. याशिवाय कच्च्या तेलाच्या आयातीवरही त्याचा परिणाम होणार असून त्यासाठी परकीय चलन अधिक खर्च करावे लागणार आहे.
भारतीय रुपयाच्या कमकुवततेबद्दल, रिलायन्स सिक्युरिटीजचे वरिष्ठ संशोधन विश्लेषक श्रीराम अय्यर म्हणाले की, आर्थिक दृष्टीकोन आणि वाढत्या रोखे उत्पन्नाच्या चिंतेमुळे जागतिक समभागांमध्ये कमजोरीमुळे सोमवारी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमजोर झाला. कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने होणारी वाढ आणि रशिया आणि युक्रेन यांच्यातील प्रदीर्घ युद्धामुळे जगभरातील चलन स्थितीवर दबाव वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.





