Indian passport। नवीन वर्षाच्या आधी भारतीय पासपोर्टला मोठा धक्का बसला आहे. जागतिक क्रमवारीत भारतीय पासपोर्टची घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय पासपोर्ट आता ८५ व्या स्थानावर घसरला आहे. पूर्वी तो ८० व्या स्थानावर होता. भारतासोबतच अमेरिकेलाही यासंदर्भात मोठा धक्का बसला आहे. हेन्ले पासपोर्ट इंडेक्स २०२५ ने एक नवीन यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार जगभरातील देशाच्या पासपोर्टविषयी माहिती देण्यात आलीय. त्यानुसार अमेरिकन पासपोर्टलाही मोठा धक्का बसला असून अमेरिकन पासपोर्ट १० व्या स्थानावरून १२ व्या स्थानावर पोहोचला आहे.जगात भारतीय पासपोर्टचे स्थान कमकुवत झाले आहे. Indian passport। गेल्या वर्षी जागतिक क्रमवारीत भारत ८० व्या स्थानावर होता. या वर्षी भारतीय पासपोर्ट पाच स्थानांनी घसरून ८५ व्या स्थानावर आला आहे. मात्र, सिंगापूरने सातत्याने आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. हेन्ले पासपोर्ट इंडेक्स २०२५ च्या यादीने जगभरातील पासपोर्टची क्रमवारी जाहीर केली आहे. भारतीय पासपोर्टच्या क्रमवारीत घसरण झाल्यामुळे, भारतीय नागरिक आता जगातील फक्त ५६ ते ५९ देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात. सिंगापूरचे नागरिक १९३ देशांमध्ये, दक्षिण कोरियाचे नागरिक १९० देशांमध्ये, जपानचे नागरिक १८९ देशांमध्ये आणि जर्मनी, इटली, स्पेन आणि स्वित्झर्लंडचे नागरिक १८७ देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात. Indian passport।