Turkey-Syria Earthquake : भूकंपग्रस्त शहरांमध्ये 10 भारतीय अडकले

अंकारा – तुर्कीयेतील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भारताच्यावतीने पाठवण्यात आलेले मदत साहित्याचे चौथे विमान तुर्कीयेमध्ये दाखल झाले आहे. भारतीय हवाई दलाच्या सी-17 विमानातून मदत सामुग्री तुर्कीयेकडे रवाना करण्यात आली आणि अदाना विमानतळावर ते पोहचले आहे.
दरम्यान, कामानिमित्त तुर्कीयेत गेलेल्या भारतीयांपैकी एक भारतीय व्यक्ती बेपत्ता आहे. त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे तुर्कीयेतील भारतीय दूतावासाच्यावतीने सांगण्यात आले आहे. याशिवाय तुर्कीयेतील दुर्गम भागात असलेले 10 भारतीय तेथेच अडकून पडले आहेत. मात्र ते तेथे सुरक्षित आहेत, असेही भारतीय दूतावासाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/4th-indian-air-force-plane-lands-in-earthquake-hit-turkey/
तुर्कीयेतील सर्वात जास्त आपत्तीग्रस्त अदाना शहरामध्ये भारतीय दूतावासाच्यावतीने एक नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. तुर्कीत वास्तव्याला असलेल्या 3 हजार भारतीयांशी या नियंत्रण कक्षाच्या माध्यामातून संपर्क ठेवण्यात येतो आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/turkey-syria-quake-deaths-pass-11000-deadliest-in-decade/
काही दिवसांपूर्वी तुर्कीयेत गेलेल्या एका भारतीय व्यक्तीशी संपर्क होऊ शकलेला नाही. या व्यक्तीला तुर्कीयेला पाठवणाऱ्या बेंगळूरूतील कंपनीच्या अधिकाऱ्यांशी आणि या व्यक्तीच्या कुटुंबियांशी नियमित संपर्क असल्याचेही भारतीय अधिकाऱ्यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.



